संकेतस्थळ धोरण आणि उत्तरदायित्वास नकार

1. उत्तरदायित्वास नकार

या पोर्टलवर विविध विभागांच्या अखत्यारीतील संकेतस्थळांची माहिती आणि मजकूर काळजीपूर्वक आणि परिश्रमपूर्वक उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र या माहितीचा केला जाणारा वापर अथवा वापरामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीची जबाबदारी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका स्वीकारत नाही. मजकुरातील कोणत्याही प्रकारची विसंगती /संभ्रमाबाबत अधिक स्पष्टीकरणासाठी वापरकर्त्याने नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या संबंधित विभागाशी/अधिकाऱ्याशी संपर्क साधावा.

2. कॉपीराइट धोरण

या संकेतस्थळावरील माहिती संकलित केली आहे, ती नि:शुल्कपणे कोणत्याही स्वरुपात किवा माध्यमात, कोणतीही विशिष्ट परवानगी न घेता पुनर्मुद्रित करता येईल. माहिती जशी आहे, तशी तंतोतंत वापरण्यात यावी. तसेच ही माहिती अपमानकारक पद्धतीने अथवा दिशाभूल करण्याच्या संदर्भात वापरता येणार नाही. या संकेतस्थळावरील माहिती किंवा तपशील वापरला जाईल, त्या प्रत्येक वेळी मूळ स्रोतास श्रेय दिले जावे. मात्र, या संकेतस्थळावर असणाऱ्या, परंतु तृतीय पक्षाकडे कॉपीराईट असणाऱ्या माहितीच्या संदर्भात, अशा माहितीचा वापर करण्याची परवानगी लागू असणार नाही. अशा प्रकारच्या माहितीचा पुनर्वापर करण्याची अधिकृत परवानगी, कॉपीराईट धारण करणाऱ्यांकडून घेतली जावी.

3. मजकूर योगदान, नियंत्रण आणि मान्यता धोरण (CMAP)

वेब माहिती व्यवस्थापक आणि नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे विविध विभाग प्रमुख मजकूर तयार करतात. हा मजकूर वेब माहिती व्यवस्थापकाद्वारे मंजूर केला जातो आणि नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यासाठी पाठवला जातो. या संकेतस्थळावरील मजकूर आक्षेपार्ह आणि/किंवा पक्षपात करणाऱ्या भाषेपासून मुक्त असेल, याची खातरजमा केली जाते. वेबमास्टरकडे प्राप्त झालेला मजकूर, वेब-आधारित मजकूर व्यवस्थापन यंत्रणेमार्फत कार्यालयीन कामकाजाच्या त्याच दिवशी संकेतस्थळावर प्रकाशित केला जातो.

4. मजकूर संग्रहण धोरण

वेब माहिती व्यवस्थापक नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरील विविध विभागांतर्गत नोंदींचे पुनरावलोकन करतो आणि नोंदी संग्रहित करण्याचा निर्णय घेतो.

5. मजकूर पुनरावलोकन धोरण

वेब माहिती व्यवस्थापक संकेतस्थळासाठीचे मजकूर पुनरावलोकन धोरण तयार करतात. हे धोरण, विविध पृष्ठांवरील मजकूर, वैधता आणि प्रासंगिकतेवर आधारित आहे. वेब माहिती व्यवस्थापक महिन्यातून एकदा संपूर्ण संकेतस्थळावरील मजकुराचे पुनरावलोकन करतात.

6. हायपरलिंकिंग बाबतचे धोरण

7. गोपनीयता धोरण

एक सर्वसाधारण नियम म्हणून हे संकेतस्थळ तुमची व्यक्तिगत ओळख स्पष्ट करणारी कोणत्याही प्रकारची माहिती (जसे नाव, दूरध्वनी क्र. अथवा ई-मेल) स्वयंचलितरित्या आपल्याकडे ठेवत नाही. हे पोर्टल तुमच्या भेटीच्या वेळा आणि सत्रप्रवेश अशा प्रकारच्या माहितीची, सांख्यिकीय हेतूसाठी (जसे इंटरनेट प्रोटोकॉल, डोमेन नेम, ब्राउजर प्रकार, ऑपरेटिंग सिस्टम, भेटीची तारीख आणि वेळ इ.) नोंद घेते. तुमच्या वैयक्तिक भेटीची नोंद असावी, या उद्देशाने आम्ही ही माहिती बाळगत नाही. आमच्या संकेतस्थळाच्या सुरक्षेला बाधा पोहोचवण्याचा प्रयत्न झाल्यास त्याचा मागोवा घेण्यासाठी आम्हाला या माहितीचा उपयोग होतो. संकेतस्थळ वापरणाऱ्या व्यक्तीने या संकेतस्थळावर कोणती माहिती / तपशील पाहिले, यावर आम्ही लक्ष ठेवत नाही. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या पोर्टलने तुमच्याकडून वैयक्तिक माहितीची मागणी केल्यास, ती कशाप्रकारे आणि कशासाठी वापरली जाईल, हे तुम्हांला सांगितले जाईल; तसेच या माहितीची गोपनीयता राखण्यासाठी पुरेशी खबरदारी घेतली जाईल.

8. मजकूर योगदान, नियंत्रण आणि मान्यता धोरण

एकसारखेपणा राखण्यासाठी आणि संबंधित मेटाडेटा आणि कीवर्डसह मानकीकरण आणण्यासाठी अधिकृत मजकूर व्यवस्थापकाद्वारे सातत्यपूर्ण शैलीमध्ये मजकूराचे योगदान दिले जाईल. दर्शकाच्या आवश्यकतेनुसार मजकूर सादर करण्यासाठी, मजकूर वर्गीकृत पद्धतीने आयोजित करणे आणि संबंधित मजकूर सक्षमपणे पुनर्प्राप्त करण्यासाठी, मजकूर व्यवस्थापन प्रणालीद्वारे संकेतस्थळावर सामग्रीचे योगदान दिले जाते जे वेब- आधारित (वेब-बेस्ड) वापरकर्ता-अनुकूल इंटरफेस असेल. संकेतस्थळावरील मजकूर संपूर्ण जीवन-चक्र प्रक्रियेमधून येतो:

एकदा मजकुर दिला की संकेतस्थळावर प्रकाशित होण्यापूर्वी ते मंजूर आणि नियंत्रित केले जाते. जर मजकूर कोणत्याही स्तरावर नाकारला गेला तर त्यात सुधारणा करण्यासाठी मजकुराच्या निर्मात्याकडे परत केला जातो. “नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका” यांनी प्रत्येक मजकूर घटकासाठी योग्य नियंत्रक व मान्यता देणारी व्यक्ती विहित केली आहे. मजकूर संग्रह धोरण: मेटाडेटा, स्रोत आणि वैधता तारखेसह मजकूर घटक तयार केले आहेत. असा काही मजकूर असेल जो कायमस्वरूपी असेल आणि अशा मजकूरासाठी असे गृहित धरले जाते की आवश्यकतेनुसार ते संपादित केले जात नाही / हटविले जात नाही तोपर्यंत दर दहा वर्षांत मजकूराचे पुनरावलोकन केले जाईल. वैधतेच्या तारखेनंतर मजकूर संकेतस्थळावर प्रदर्शित केला जाणार नाही. निविदा, भरती इ. सारख्या अल्पायुषी माहिती घटकांपैकी काही, ज्यांचे हेतू साध्य झाल्यानंतर संकेतस्थळावर कोणतीही प्रासंगिकता नसेल. मजकूर पुनरावलोकन धोरणानुसार मजकूर घटक जसे दस्तऐवज, अहवाल; ताज्या बातम्यांचे नियमितपणे पुनरावलोकन केले जाते. वैधतेच्या तारखेच्या किमान दोन आठवड्यांआधी मजकूराचे पुनरावलोकन केले जाते आणि आवश्यक असल्यास मजकूर पुन्हा वैध केला जातो आणि वैधता तारीख सुधारित केली जाते. जर मजकूर संबंधित नसेल, तर मजकूर संग्रहित केला जातो आणि संकेतस्थळावर त्यानंतर प्रकाशित केला जात नाही. वर नमूद केलेले धोरण अंमलात आहे आणि संकेतस्थळ चालू ठेवतांना र्त्याचे पालन केले जाईल. मजकूर पुनरावलोकन धोरण : संकेतस्थळावर असलेला मजकूर सद्यकालीन आणि अद्ययावत ठेवण्यासाठी शक्य तितके सर्व प्रयर्त्न करणे आवश्यक आहे. मजकूर पुनरावलोकन धोरण हे संकेतस्थळ मजकूर पुनरावलोकनाच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या तसेच ते ज्या पद्धतीने करणे आवश्यक आहे र्त्यास परिभाषित करते. पुनरावलोकन धोरणे विविध मजकूर घटकांसाठी परिभाषित केलेली आहेत. मजकूर घटकांचे भिन्न प्रकार, र्त्याची वैधता आणि प्रासंगिकता तसेच संग्रहीत धोरण यांवर पुनरावलोकन धोरण आधारित आहे. “नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका” कार्यसंघाकडून वर्षभरातून एकदा मांडणीच्या सिटॅक्सच्या) तपासणीसाठी संपूर्ण संकेतस्थळाच्या मजकूराचे पुनरावलोकन केले जाईल. संकेतस्थळ देखरेख धोरण : “नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका” यामध्ये संकेतस्थळ देखरेखीचे धोरण आहे आणि खालील मापदंडांच्या संदर्भात गुणवत्ता व सुसंगततेच्या समस्या सोडनवण्यासाठी व र्त्यांचे निराकरण करण्यासाठी संकेतस्थळाचे वेळोवेळी निरीक्षण केले देखरेख केली) जाते

9. अटी आणि शर्ती

एकसारखेपणा राखण्यासाठी आणि संबंधित मेटाडेटा आणि कीवर्डसह मानकीकरण आणण्यासाठी अधिकृत मजकूर व्यवस्थापकाद्वारे सातत्यपूर्ण शैलीमध्ये मजकूराचे योगदान दिले जाईल. दर्शकाच्या आवश्यकतेनुसार मजकूर सादर करण्यासाठी, मजकूर वर्गीकृत पद्धतीने आयोजित करणे आणि संबंधित मजकूर सक्षमपणे पुनर्प्राप्त करण्यासाठी, मजकूर व्यवस्थापन प्रणालीद्वारे संकेतस्थळावर सामग्रीचे योगदान दिले जाते जे वेब- आधारित (वेब-बेस्ड) वापरकर्ता-अनुकूल इंटरफेस असेल. संकेतस्थळावरील मजकूर संपूर्ण जीवन-चक्र प्रक्रियेमधून येतो:

10. संकेतस्थळ देखरेख योजना

या संकेतस्थळासाठी देखरेख धोरण तयार केले आहे. या धोरणाला अनुसरून खाली नमूद बाबींच्या संदर्भात, गुणवत्ता आणि सुसंगतता सबंधी समस्यांचे निराकरण करण्यासाठी या संकेतस्थळाचे नियमितपणे परीक्षण केले जाते.

11. कामगिरी

संकेतस्थळाचा सर्वोत्कृष्ट परिणामकारक वापर करता यावा, यासाठी विविध नेटवर्क जोडण्या आणि उपकरणांना अनुसरून संकेतस्थळ डाऊनलोड करण्याची खबरदारी घेतली जाते. त्या दृष्टीने संकेतस्थळावरील सर्व महत्त्वाच्या पृष्ठांची चाचणी केली जाते.

12. कार्यक्षमता

संकेतस्थळाच्या कार्यक्षमतेची खातरजमा करण्यासाठी त्यावरील सर्व घटकांची तपासणी केली जाते. अभिप्राय प्राप्त करणाऱ्या पृष्ठावरील अर्ज सुविहितपणे कार्य करत आहे.

13. विखुरलेले दुवे

संकेतस्थळावर कोणत्याही भागात, कोणत्याही पृष्ठावर विखुरलेले किंवा सदोष दुवे नसावेत, याची खातरजमा करण्यात आली आहे.

14. विश्लेषण

संकेतस्थळाच्या वापराच्या पद्धतींचे तसेच अभ्यागतांचे भेटीचे विश्लेषण करण्यासाठी निरीक्षण केले जाते.

15. अभिप्राय

अभिप्रायाच्या माध्यमातून अभ्यागतांनी सुचविल्याप्रमाणे बदल आणि सुधारणा करून घेण्यासाठी योग्य यंत्रणा कार्यरत आहे.

16. आपत्कालीन व्यवस्थापन योजना

संकेतस्थळाचे विद्रूपीकरण झाल्यास किंवा संकेतस्थळावर नैसर्गिक आपत्तींचा संभाव्य परिणाम कमी करण्याच्या दृष्टीने आपत्कालीन व्यवस्थापन योजना महत्वाची आहे. या संकेतस्थळासाठी अशा प्रकारची आपत्कालीन योजना विकसित करताना आम्ही पुढील बाबी प्राधान्याने लक्षात घेतल्या आहेत: जोखमीचा अंदाज, आपत्कालिन प्रतिसाद चमू, संप्रेषण योजना, डेटा बॅकअप आणि पुनर्प्राप्ती, भौतिक सुरक्षा उपाय, योजनेचे नियमित पुनरावलोकन आणि अद्यतन ई.

17. संकेतस्थळ सुरक्षा धोरण

  1. a. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका या संकेतस्थळासाठी सुरक्षित सर्व्हर वापरते. आम्ही आमच्या संकेतस्थळावरील माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी आणि आमच्या अखत्यारीत असलेल्या माहितीला योग्य ते संरक्षण प्रदान करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. माहिती सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने, आमचे संकेतस्थळ होस्ट करणार्‍या संगणक प्रणाली, नेटवर्क ट्रॅफिकवर देखरेख करण्यासाठी सॉफ्टवेअर प्रोग्राम वापरतात आणि त्यांच्या डिव्हाइसेसशी तडजोड करण्याचे अनधिकृत प्रयत्न ओळखतात. सुरक्षासंबंधी देखरेख करताना गुन्हेगारी कारवायांचे संभाव्य पुरावे आढळून आले, तर अशा कारवायांशी संबंधित माहिती, कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या अधिकार्‍यांना प्रदान केली जाऊ शकते. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका संकेतस्थळामध्ये अशी माहिती आहे जी सहजपणे उपलब्ध आहे आणि कोणत्याही अभ्यागताद्वारे ती पाहिली जाऊ शकते. तथापि, संकेतस्थळ त्यांच्या सर्व संकेतस्थळावरील माहितीमध्ये कॉपीराइट हक्क राखत आहे. अधिकृत सुरक्षा तपासणी आणि डेटा संकलन वगळता स्वतंत्र वापरकर्त्यांना ओळखण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जाणार नाहीत. संचित डेटा लॉग नियमित हटविण्याकरिता अनुसूचित केले जातील. संकेतस्थळ गोपनीयता धोरण ग्राहकांनी / अभ्यागतांनी प्रदान केलेल्या वैयक्तिक माहितीच्या वापराविषयी आमच्या स्थितीचे वर्णन करते.

  2. b. माहिती अपलोड करण्याचा किंवा माहिती बदलण्याचा अनधिकृत प्रयत्न करण्यास मनाई आहे, आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 नुसार शिक्षेस पात्र असू शकते.

  3. c. वापरकर्ता आयडी आणि संकेतशब्द धोरणः “नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका” संकेतस्थळावरील संवेदनशील किंवा मालकी व्यवसायाची माहिती केवळ अशा वापरकर्त्यांपुरती मर्यादित आहे ज्यांना अशा डेटाचा वापर करण्यासाठी योग्य अधिकृत कारण असल्याचे निश्चित केले गेले आहे. सुरक्षिततेचा हक्क मंजूर केलेले सर्व नोंदणीकृत वापरकर्ते वेबमास्टरद्वारे प्रदान केलेल्या वापरकर्त्याच्या नावाने (युजर नेम) ओळखले जातील.

  4. d. ज्या वापरकर्त्यांना प्रतिबंधित माहितीमध्ये संकेतशब्द (पासवर्ड) हक्क मंजूर आहे, त्यांना कोणत्याही तृतीय पक्षाकडे ते संकेतशब्द सामायिक करण्यास किंवा ते संकेतशब्द प्रकट करण्यास मनाई आहे. वापरकर्ता आयडी (ओळख) किंवा संकेतशब्द (पासवर्ड) हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास किंवा वापरकर्त्यास असा विश्वास असेल की एखाद्या अनाधिकृत व्यक्तीने वापरकर्ता आयडी (वापरकर्ता ओळख) किंवा संकेतशब्द (पासवर्ड) शोधला आहे, तर वापरकर्ता त्वरित आम्हाला सूचित करेल.

  5. e. “नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका” संकेतस्थळ सुरक्षा धोरणाबाबत तुम्हांला काही प्रश्न किंवा टिप्पण्या असल्यास, कृपया “नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका” संकेतस्थळावरील अभिप्राय पर्यायाचा वापर करुन वेब माहिती व्यवस्थापकाशी संपर्क साधावा.