महाराष्ट्राच्या आग्नेय सीमेवर, तेलंगणाच्या वायव्य सीमेवर आणि कर्नाटकच्या उत्तरेस नांदेड जिल्हा येतो. लातूर, परभणी, हिंगोली व यवतमाळ हे महाराष्ट्रातील जिल्हे, निजामाबाद, कामारेड्डी, निर्मल, आदिलाबाद हे तेलंगणातील, आणि बीदर हा कर्नाटकातील जिल्हा नांदेडला जोडून आहेत. अधिक वाचा…
नांदेड हे महाराष्ट्र राज्यातलं दहावं सर्वात मोठं शहर आहे आणि भारतातील ७९ वे सर्वाधिक लोकसंख्या असलेलं शहर आहे. मराठवाड्यातलं दुसरे मोठे शहर गोदावरी नदीच्या दोन्ही तीरांवर वसलेलं आहे. हे महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा विभागात असलेले आणि नांदेड जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. अधिक वाचा…
नांदेड वाघाळा शहराची पालक संस्था म्हणजे नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका. महाराष्ट्र शासनाने नांदेड नगरपालिका आणि वाघाळा नगरपालिका यांचे एकत्रीकरण करून, शासन अधिसूचना क्रमांक १५९६/३५४/प्र. क्र. २२५/नवि-२४, दिनांक २६ मार्च, १९९७ नुसार या महानगरपालिकेची स्थापना केली आहे. अधिक वाचा…