nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
नांवाशमनपा हदिदत पाण्याच्या टँकर व्यवस्थेबाबत. ||  
समाचार

Dated :07-Dec-2012
खेळामुळे अधिक सक्षमपणे काम करता येते- जी. श्रीकांत महापालिकेतर्फे प्रथमच आंतरकार्यालयीन क्रिकेट स्पर्धेस प्रारंभ

दहा संघांचा सहभाग: रविवारपर्यंत स्टेडियमवर चालणार स्पर्धा

नांदेड, दि. 7: कर्मचार्‍य़ांना कार्यालयीन कामाबरोबरच स्वतःच्या आरोग्य आणि क्रीडाविषयक बाबीमध्ये सहभागी केले तर अधिक सक्षमपणे आणि उत्साहाने काम करण्याची प्रवृती निर्माण होते, असे प्रतिपादन मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी महापालिकेतर्फे आयोजित आंतरविभागीय क्रिक्रेट स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी केले.

महापालिकेच्या वतीने प्रथमच आंतरकार्यालयीन 15 षटकांची क्रिकेट सामने आज शुक्रवारपासून श्री गुरुगोविंदसिंहजी स्टेडीयमवर सुरु झाले. त्यावेळी ते बोलत होते. महापालिकेचे स्टेडियम व्यवस्थापक रमेश चवरे, सहाय्यक आयुक्त शिवाजी डहाळे, आर. जी. जाधव, विजय मोडके, विनोद गोस्वामी यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.

या स्पर्धेत जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, आयुर्वेदिक महाविद्यालय, जिल्हा न्यायालय, महापालिका, पोलिस अधिक्षक कार्यालय, रेल्वे कार्यालय, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, क्रिडा शिक्षक संघटना अशा दहा क्रिकेट संघांनी सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे स्पर्धेत त्या-त्या विभागातील तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

सदर स्पर्धा दि. 9 डिसेंबरपर्यंत चालणार आहेत. पहिला सामना स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ आणि रेल्वे कर्मचारी संघात होऊन त्यात अटीतटीच्या लढतीत विद्यापीठ संघाने अवघ्या एका धावाने विजय मिळवला. दुसरा सामना वैद्यकीय महाविद्यालय आणि क्रीडा शिक्षक संघटना यांच्यात होऊन वैद्यकीय महाविद्यालयाने 67 धावांनी विजय मिळवला. उद्या शनिवारी (दि.8) सकाळी आठ वाजता महानगरपालिका विरुध्द जिल्हा न्यायालय, सकाळी साडेदहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय विरुध्द जिल्हा परिषद आणि दुपारी दीड वाजता पोलिस अधिक्षक कार्यालय विरुध्द स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठ अशी लढत होणार आहे.

====================================================================

====================================================================

====================================================================

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.