nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
नांवाशमनपा हदिदत पाण्याच्या टँकर व्यवस्थेबाबत. ||  
समाचार

Dated :06-Dec-2012
एलबीटी चुकवण्याचा प्रयत्न उघडकीस 


· सिमेंट विक्रेत्याने आणला विनाबिलाचा माल
· उडवाउड्वीची उत्तरे दिल्याने दुकानास सील

नांदेड, दि.6: मनपा क्षेत्रात विनाबिलाचा सिमेंटचा माल आणून तपासणीसाठी खोट्या पावत्या सादर केल्याचा प्रयत्न गुरुवारी (दि.6) एलबीटी विशेष तपासणी पथकाच्या लक्षात आल्याने नवा मोंढा भागातील एका सिमेंटच्या दुकानास सील ठोकण्यात आले.

नवा मोंढा भागातील बिडवई ट्रेडींग कंपनी या दुकानात सिमेंटचा माल एका ट्रकद्वारे उतरला. ट्रकमध्ये जास्त पोते असताना व्यापार्‍याने पथकाला केवळ 200 पोते सिमेंट उतरल्याचीच पावती सादर केली. याबाबत व्यापार्‍यास विचारणा केली असल्यास त्याने दिशाभूल करुन पथकाला उडवाउडवीची उत्तरे दिली तसेच दुकानातील मालाचे बीलदेखील दिले नाही. यावरुन सदर व्यापार्‍याचा उद्देश स्थानिक संस्था कर चुकवण्याचा असल्याचा निष्कर्ष काढत सदर दुकानास सील ठोकण्यात आले. सहाय्यक आयुक्त सौ. वसुधा फड यांच्या नेतृत्वाखाली एलबीटी विभागातील कर्मचार्‍यांनी ही कारवाई केली.

विवरणपत्रासाठी पुन्हा मुदतवाढ
स्थानिक संस्था कर अधिनियम 2010 मधील तरतुदीनुसार सहामाही विवरणपत्र सादर करण्यासाठी यापुर्वी व्यापार्‍यांना दोन वेळा संधी दिली होती. या कालावधीत अनेकांनी विवरणपत्र दाखल केले नसल्याचे आढळून आले आहे. ज्या व्यापारी प्रतिष्ठानांची वार्षीक खरेदी 25 लाखांपेक्षा कमी आहे, अशांनी 15 डिसेंबरपर्यंत लेखी पत्राद्वारे मनपाच्या एलबीटी विभागास कळविणे आवश्यक आहे. अन्यथा संबधीतांविरुध्द दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे मनपाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.