nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
नांदेड महानगरपालिका केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजने अंतर्गत राष्ट्रीय नदीकृती आराखडा (NRAP) अंतर्गत गोदावरी नदी कायमस्वरुपी प्रदुषणमुक्त करण्यासाठी उपाययोजना करणे करीता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे व सल्लागाराची नेमणुक करणे. || साफसफाईच्या कामाच्या वेळेत बदल बाबत ||  
समाचार

Dated :06-Dec-2012
कामचुकार माळी सक्तीने सेवानिवृत्त  


मनपा आयुक्तांची कारवाई

नांदेड, दि.6: पाच वेळा निलंबनासह अनेक प्रकारच्या प्रशासकीय शिक्षा केल्यानंतरही कामात सुधारणा केला नसल्याचा ठपका ठेवत गांधीपुतळा उद्यानात काम करणार्‍या एका माळी कम पुरुष मजुराला मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी आज गुरुवारी (दि.6) नोकरीवरुन काढून टाकण्याची कारवाई केली आहे.

प्रकाश कोंडिबा कांबळे हे पुरुष मजूर तत्कालीन नांदेड नगरपालिका आस्थापनेवर 3 डिसेंबर 1993 रोजी रुजू झाले होते. परंतु वारंवार अनाधिकृतणे गैरहजर राहणे, वरिष्ठांशी उध्दट वर्तणूक करणे, मद्यप्राशन करुन इतर कर्मचार्‍यांना शिवीगाळ करणे, दिलेली कामे वेळेवर न करणे, कार्यालयीन कामात अडथळे निर्माण करणे अशा वेगवेगळ्या कारणावरुन त्यांना नोटीसा देण्यात आल्या होत्या. परंतु त्याच्या वर्तनात कोणतीही सुधारणा झाली नसल्याने 1998 ते 2004 यादरम्यान चार वेळी निलंबीत करण्यात आले होते.

त्यानंतर त्यांच्या बडतर्फीच्या विषयात तत्कालीन स्थायी समितीच्या विनंतीवरुन पुनर्विचार करुन पुन्हा रुजू करताना त्यांना मूळ वेतनावर आणले होते. त्यानंतरही कामचुकारपणा कमी झाला नसल्याने त्यांना पुन्हा निलंबीत करण्यात आले. कांबळे यांच्या सेवा अभिलेख्यातील सर्व शेरे प्रतिकूल व काम असमाधानकारक असल्याने त्याच्या सेवेची मनपाला गरज नाही, असा अभिप्राय देत मनपा आयुक्तांनी त्यांना सक्तीची सेवानिवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे.


कामचुकार कर्मचार्‍यांच्या वर्तनात सुधारणा झाली नसल्याच्या कारणावरुन मागच्या आठवड्यात आयुक्तांनी दोन कर्मचार्‍यांवर बडतर्फीची कारवाई केली होती. त्यापाठोपाठ आज आणखी एका कर्मचार्‍यास सक्तीने सेवानिवृत्त केल्यामुळे कामचुकार कर्मचारी आता आपल्या कामात सुधारणा करण्याच्या मागे लागले आहे.

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.