nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
नांवाशमनपा हदिदत पाण्याच्या टँकर व्यवस्थेबाबत. ||  
समाचार

Dated :05-Dec-2012
शालेय विद्यार्थी बनले ‘ट्रॉफिक कमांडो’ 

• महिन्यातील एक दिवस वाहतुकीचा
• आयुक्तांच्या आवाहनास शाळांचा प्रतिसाद

नांदेड, दि. 6: मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील काही शाळेचे विद्यार्थीही वाहतुकीला शिस्त लावण्याच्या मोहिमेत सहभागी झाले आहेत. गवळीपुरा येथील आंध्रा समिती शाळेच्या दहा विद्यार्थ्यांनी मंगळवारी (दि.4) सांयकाळी आयुर्वेद महाविद्यालयासमोरील सिग्नलवर वर्दळीच्या वेळेत एक तास थांबून वाहतुकीचे नियंत्रण केले. वाहतुकीचे नियम तोडणार्‍या वाहनधारकांना गुलाबाचे फूल देत पुन्हा वाहतुकीचे नियम तोडू नये, अशी विनंतीही विद्यार्थ्यांनी यावेळी केली.

मनपा आयुक्तांनी मागच्या आठवड्यात झालेल्या नांदेड आय केअरच्या बैठकीनंतर शहरातील वाहतुकीच्या प्रश्नावर आपले लक्ष केंद्रीत केले असून कलामंदीर, बसस्थानक व रेल्वेस्थानक परिसरात त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन वाहतुक विस्कळीत होण्यामागची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यापूर्वीच्या आठवड्यात त्यांनी लेखी पत्राद्वारे शहरातील सात प्रमुख सिग्नलपासून जवळच्या अंतरावर असलेल्या काही शाळांना एक पत्र पाठवले होते. शाळेतील आठवी-नववीच्या आठ ते दहा विद्यार्थ्यांकडून दर महिण्याच्या पहिल्या आठवड्यातील एक दिवस ‘वाहतूक दिवस’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन त्यात केले होते. उपक्रमात सहभागी होणार्‍या विद्यार्थ्यांना शहर वाहतूक शाखेच्या वतीने आवश्यक ते प्रशिक्षण देण्याचे तसेच मनपाच्या वतीने प्रमाणपत्र देण्याचे शाळांना कळविण्यात आले होते.

या आवाहनास शाळांनीही लगेच प्रतिसाद दिला असून सर्वप्रथम गवळीपुरा येथील आंध्रा समिती शाळेने शुभम लोटे, शेख समीर, अमरजीतसिंघ शाहू, हरविंदरसिंघ लंगारी, जसपालसिंघ बेदी, जसप्रितसिंघ बडगुजय, शिवा लोटे, जर्नेलसिंघ निशानची, सुखविंदर्सिंघ कहलोन, सुरेंद्रपालसिंघ पुजारी या दहा वाहतूक विद्यार्थी सैनिकांना (ट्रॉफिक कमांडो) डॉक़्टर लेन- आयुर्वेद महाविद्यालयाच्या सिग्नलवर सायंकाळी साडेपाच ते साडेसहा या वर्दळीच्या वेळेत थांबवून त्यांच्याकडून वाहतुकीवर नियंत्रण केले. एकेरी मार्गाने वाहने घुसवणार्‍या तसेच सिग्नल तोडून पुढे जाणार्‍या वाहनधारकांना या विद्यार्थ्यांनी गुलाबाचे फूल देऊन यापुढे वाहतुकीचे नियम तोडू नये, अशी विनंती करित पुन्हा मागे आणले. शाळेच्या वतीने दर महिन्यातील पहिल्या आठवड्यातील एक दिवस - एक तास हा उपक्रम सुरु ठेवण्यात येणार असल्याचे शाळेचे एनसीसी अधिकारी आर. जी. जाधव यांनी सांगितले. या उपक्रमासाठी शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी तसेच मनपाचे परिवहन अधिकारी राजकुमार वानखेडे यांनी आवश्यक ते सहकार्य केले. अन्य शाळांनीही याच पध्दतीन पुढे येवून शहर वाहतूक शिस्तीच्या मोहिमेत आपला सहभाग द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

====================================================================

====================================================================

====================================================================

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.