![]() | ||
| ||
समाचार |
|
Dated :05-Dec-2012 |
|
इलेक्ट्रीकच्या होलसेल दुकानावर एलबीटी विभागाची धाड | |
11 ग़ाळ्यांच्या गोडावूनची तीन सहाय्यक आयुक्तांकडून तपासणी नांदेड, दि.5: विजेच्या उपकरणासह इतर विद्युत साधने व त्याचे सुटे भाग होलसेल भावाने विकणार्या राज इलेक्ट्रीकल्स या दुकानवजा गोडावूनवर बुधवारी (दि.5) एलबीटी धाड टाकली. एकाच अपार्टमेंटमधील तब्बल 10 गाळे या एकमेव फर्मची असून तेथूनच मालाची विक्री होत होती. या कारवाईत सहाय्यक आयुक्त वसुधा फड यांच्यासोबत अशोकनगर कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त अविनाश आटकोरे, सिडको कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त गुलाम सादेक यांनीसहभाग घेतला. महावीर चौकाजवळील बंदाबहादूर मार्केटशेजारी अर्धापुरकर हॉस्पीटलसमोर असलेल्या राधेश्याम अपार्टमेंटमध्ये राज इलेक्टीकल्स हे विद्युत साहित्याचे होलसेल दुकान आहे. दुकानासाठी पहिल्या माळ्यावर जवळपास 8 ग़ाळे, खालच्या माळ्यावर 2 तर जवळच असलेल्या भाग्यलक्ष्मी बॅकेखालच्या एका गाळ्यात या विक्रेत्याच्या विद्युत साहित्याचा मोठा साठा ठेवलेला होता. हा सर्व माल एकाच दुकानाशी संबधीत असल्याचे लक्षात आल्यानंतर पथकाने विक्रेत्याकडे मालाच्या बिलांची मागणी केली. परंतु विक्रेत्याने सध्या बिले उपलब्ध नसल्याचे सांगितले. त्यामुळे पथकातील जवळपास 20 कर्मचार्यांनी सर्व मालाची नोंद घेणे सुरु केले असून मालाचा साठा खूप मोठा असल्याने रात्री उशीरार्यंत ही कारवाई सुरु होती. विवरणपत्र जुळेना नांदेड महापालिकेच्या हद्दीत इलेक्ट्रीक साहित्याला 3 टक्के स्थानिक संस्था कर लागू आहे. राज इलेक्ट्रीकच्या मालकाने महापालिकेच्या एलबीटी विभागाकडे दाखल केलेले विवरणपत्र आणि दुकानात प्रत्यक्ष असलेला साठा याचे निरिक्षण केले असता खूप मोठी तफावत आढळून आली. संबधित विक्रेत्याकडून अगदी अल्प स्वरुपाचा स्थानिक संस्था कर भरण्यात येत असल्याचे यावेळी सादर केलेल्या कागदपत्रांमधून दिसून आले. दुकानदाराच्या प्रतिनिधीने यावेळी ‘आम्ही वेगवेगळ्या 12 लोकांच्या नावाने एलबीटी परवाना घेऊन त्याद्वारे याच दुकानातील मालाचा कर भरतो,’ असा बचावाचा प्रयत्न केला. परंतु पथकाने त्यांचा हा दावा फेटाळून लावत आमचे काम आम्हाला करू द्या, अशी विनंती करीत तपासणीचे काम सुरुच ठेवले. वाजेगावातून मालाचा ऑटो दाखल पथकाच्या भेटीदरम्यान वाजेगाव येथून राजेंद्र इलेक्ट्रीकल्स, वाजेगाव या नावाने भाग्यलक्ष्मी बॅकेखालच्या गोडावूनमध्ये दाखल झालेल्या एक़ा ऑटोचीही पथकाने नोंद घेतली. त्यामुळे याआधीच्या धाडीप्रमाणे राज इलेक्ट्रीकल्सचेही वाजेगाव येथे गोडावून असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ..तर बाजारभावानुसार एलबीटी सर्व मालाची नोंद पूर्ण केल्यानंतर संबधित विक्रेत्यास त्यांच्याकडील मालाच्या खरेदीची बिले सादर करण्यास सांगण्यात आले असून विक्रेत्याने बिले सादर केली नाहीत तर बाजारभावानुसार सर्व साहित्यावर एलबीटी आकारण्यात येईल, असे सहाय्यक आयुक्त सौ. फड यांनी सांगितले.
====================================================================
==================================================================== |
|