nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
जाहिर लिलाव सूचना : - नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हददीतील तयबाजारी, आठवडी बाजार, दैनिक जमिन भाडे (नो हॉकर्स झोन वगळून) भाडे वसुलीचा मक्ता ताबा देणे बाबत. || नांवाशमनपा जाहीर सुचना ||  
समाचार

Dated :04-Dec-2012
मालमत्ता कराच्या थकबाकीसाठी सिडकोत आणखी एका दुकानाला सील  


नांदेड, दि. 4: महापालिकेचा मालमत्ता कर थकवणार्‍या आणखी एका दुकानाला मंगळवारी (दि.4) मनपा सिडको क्षेत्रिय कार्यालयाच्या वसुली पथकाने सील ठोकले. सहाय्यक आयुक्त गुलाम सादेक व त्यांच्या सहकार्‍यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सिडको क्षेत्रीय कार्यालयांअतर्गंत (क्र.5) कौठा भागातील सौ. अल्का श्यामसुंदर काळे यांच्या मालमत्तेतील क्र. 10-2-1197 या दुकानाच्या मालमत्ता करापोटी त्यांच्याकडे 34 हजार 938 रुपये थकबाकी येणे होती. महापालिकेने मागणी बील व नोटीसा पाठवूनदेखील संबधितांनी आपल्याकडील कराचा भरणा करण्यास टाळाटाळ केली.
मंगळवारी त्यांच्याकडे करवसुली व जप्ती पथक गेल्यानंतरही त्यांनी कराचा भरणा करण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांच्या दुकानाला सील ठोकणात आले. आयुक्त जी. श्रीकांत, अप्पर आयुक्त राम गगराणी, उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक आयुक्त गुलाम सादेक यांच्या नेतृत्वाखाली गौसोद्दीन जहिरोद्दीन, भालचंद्र चामे, श्रीकांत चौदंते, अ. हबीब अ. रशीद, रणजित जोंधळे, पदमाकर कावळे, किशन वाघमारे, वाय. के. ढगे, गाडीवाले, वामन पारेकर यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. इतर मालमत्तधारकांनीही आपल्याकडील मालमत्ता कर भरुन जप्तीची कारवाई टाळावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.


====================================================================

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.