nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
नांदेड महानगरपालिका केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजने अंतर्गत राष्ट्रीय नदीकृती आराखडा (NRAP) अंतर्गत गोदावरी नदी कायमस्वरुपी प्रदुषणमुक्त करण्यासाठी उपाययोजना करणे करीता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे व सल्लागाराची नेमणुक करणे. || साफसफाईच्या कामाच्या वेळेत बदल बाबत ||  
समाचार

Dated :03-Dec-2012
मोकाट जनावरांना सांभाळा अन्यथा आता मालकांवर पोलिसांत गुन्हे  

महापालिकेचा इशारा

नांदेड, दि. 3: महापालिका हद्दीत रस्त्यावर मोकाट फिरणार्‍या जनावरांना पकडण्याची मोहिम महापालिकेने सुरु केली असून जनावरांच्या मालकांकडून दंड आकारण्यात येत आहे. मोकाट जनावरांमुळे अपघात घडण्याचे प्रमाण लक्षात घेता संबधित जनावरांच्या मालकांवर गुन्हे नोंदवण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेचे अप्पर आयुक्त रा. ल. गगराणी यांनी दिली.

मोकाट जनावरांच्या बंदोबस्तासाठी नुकतीच विशेष मोहिम राबवण्यात आली. त्याअंतर्गत 318 जनावरे पकडून गोकुळनगर येथील कोंडवाड्यात दाखल केल्यानंतर त्यांच्या मालकांकडून 73 हजार 970 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. मोकाट जनावरांमुळे वाहतूक व रहदारीस मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होत असून अपघाताच्या घटना घडत आहेत. त्याकरिता कोणत्याही जनावरांच्या मालकांनी आपली जनावरे मोकाट सोडू नयेत. मोक़ाट जनावरे पकडल्यानंतर त्याच्या जिवित्वाची जबाबदारी महापालिका प्रशासनावर राहणार नाही. कोंडवाड्यात जनावर दाखल झाल्यानंतर त्यांच्या मालकाने जास्तीत जास्त दहा दिवसात जनावराची मालकी सिध्द करुन तसेच दंडाची रक्कम भरुन जनावरे घेऊन जावीत, अन्यथा संबधित जनावरे गोरक्षण संस्थेला देखभालीसाठी नि:शुल्क हस्तांतरीत केले जातील आणि त्यानंतर कोणताही आक्षेप स्विकारला जाणार नाही. असे महापालिकेच्या वतीने कळविण्यात आले आहे.

जनावरांच्या कोंडवाडा शुल्कात वाढ
जनावरांच्या कोंडवाडा शुल्कात वाढ करण्यात आली असून आता जनावरांना पकडल्यानंतर मोठ्या जनावरांसाठी प्रति दिवस 250 रुपये, खुराकीपोटी 250 रुपये दंड व अनामत रक्कम 750 रुपये आकारण्यात येतील. तर छोट्या जनावरांसाठी दंड व खुराकी खर्च प्रत्येकी 125 तर अनामत 500 रुपये अशी रक्कम वसूल केली जाणार आहे. सहा महिन्याच्या कालावधीत संबधित मालकाचे जनावर पुन्हा कोंडवाड्यात आले तर त्याची अनामत रक्कम जप्त केली जाईल. अन्यथा ती संबधितांना परत दिली जाईल, असे महापालिकेचे पशु शल्य चिकित्सक डॉ. रईसोद्दीन यांनी सांगितले.

दहा दिवसात जनावरे न्या, अन्यथा हस्तांतरीत
जनावरांच्या मालकांनी कोंडवाड्यात आणलेल्या जनावराचा पुरावा दहा दिवसात देऊन आपली जनावरे सोडवून नेली नाहीत, तर संबधित जनावरे देखभालीसाठी गोरक्षण संस्थेकडे हस्तांतरीत केली जातील. गोरक्षण संस्थेने नकार दिल्यास सदर जनावरे जंगलात नेऊन सोडण्यात येतील. परंतु दहा दिवसानंतर मालकास जनावर परत मिळणार नाही किंवा त्यांचा कोणताही हक्क राहणार नाही, याची सर्व संबधितांनी नोंद घ्यावी असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

====================================================================

====================================================================

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.