nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
प्रगटन – नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड च्या सर्व सेवानिवृत्त /कुटुंब निवृत्त वेतनधारक यांनी हयात रजिष्टरवर सही केलेले नाही अशा सर्व सेवानिवृत्त कर्मचारी यांनी दि. 31.05.2022 पर्यंत मनपा मुख्य ईमारततील लेखा विभाग खोली क्रं. 311 मध्ये येवून हयात रजिष्टरवर सही करणेसाठी अवगत करावे. || मनपा नांदेड, साफसफाईच्या कामाच्या वेळेत बदला बाबत ||  
समाचार

Dated :01-Dec-2012
साडेतेरा लाखांच्या थकबाकीसाठी रिलायन्सच्या टॉवरला सील 

नांदेड, दि.1: मालमत्ता कराची साडेतेरा लाखाच्या थकबाकीपोटी पुषपनगर येथील रिलायंस इंफोटेच्या मोबाईल टॉवरला शनिवारी सील ठोकण्यात आले. सहाय्यक आयुक्त प्रकाश येवले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.

क्षेत्रिय कार्यालय क्र.1 शिवाजीनगर अंतर्गत पुष्पनगर येथील मालमत्ता क्र. 1-7-523/1 एम. रिलायन्स इन्फोटेक लिमिटेड यांच्याकडे मालमत्ता करापोटी 13 लाख 49 हजार 757 एवढ्या रक्कमेच्या थकबाकी थकीत होती. आज दि.1 डिसेंबर रोजी मनपाच्या पथकाने मोबाईल टॉवरचा विद्युत पुरवठा खंडीत करुन मोबाईल टॉवर जप्त केले .
महानगरपालिकेत जेएनएनयुआरएम योजने अंतर्गत मालमत्ता कराची वसुली 95 टक्के करणे बंधनकारक आहे. त्यादृष्टीने आयुक्त जी.श्रीकांत, अप्पर आयुक्त राम गगराणी आणि उपआयुक्त (महसूल) रत्नाकर वाघमारे यांच्या आदेशान्वये सहाय्यक आयुक्त प्रकाश येवले यांच्या मार्गदर्शनाखाली कर निरिक्षक गुडमलवार, गोपाळ हिवराळे, मझरोद्दीन सिद्यीकी, पुरुषोत्तम गाढे, अब्दुल नईम, राहुल सोनसळे, मेघराज जोंधळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली. याशिवाय 8,30,806 रुपयांच्या कराची रोख वसूली केली.

तसेच काल 30 नोव्हेंबर रोजी मालमत्ता क्र.1-.2-75 आणि 1-10-622 याच्यावरील थकबाकीपोटी दोन मोबाईल टॉवरचा विद्युत पुरवठा खंडीत करुन जप्ती केली. तसेच 3 लाख 32 हजार 525 रुपये वसूल करुन रु.1 लाख 91 हजार 926 रुपयांची वसुली केल्याची माहिती प्रकाश येवले यांनी दिली.

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.