nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
नांवाशमनपा हदिदत पाण्याच्या टँकर व्यवस्थेबाबत. ||  
समाचार

Dated :01-Dec-2012
शास्ती माफी योजनेस 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ- महापौर  

नांदेड, दि. 1: मालमत्ता कराची संपूर्ण थकबाकी व चालू कर भरल्यास महापालिकेने जाहीर केलेल्या शास्ती माफी योजनेला येत्या 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली असून मालमत्ताधारकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन आपल्याकडील सर्व कराचा भरणा करावा, असे आवाहन महापौर अब्दुल सत्तार यांनी केले आहे.

शिक्षण हक्क कायद्याची माहिती सर्व नगरसेवकांना देण्यासाठी शुक्रवारी (दि.30) झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत नगरसेवक गफ्फार खॉंन यांनी खास बाब म्हणून मुद्दा मांडण्याची विनंती करुन शास्ती माफी योजनेला 31 डिसेंबर 2012 पर्यंत मुदतवाढ देण्याची प्रस्ताव मांडला. दिवाळी व अन्य सणांमुळे नागरिक या संधीचा पूर्णपणे लाभ घेऊ शकले नाही, असा युक्तीवाद करून महापौरांनी या योजनेला मुदतवाढ देण्याचे निर्देश प्रशासनाला द्यावेत, असे आपल्या प्रस्तावात म्हटले. नगरसेवक प्रवीण बियाणी यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले.

त्यानंतर महापौर अब्दुल सत्तार यांनी तात्काळ हा प्रस्ताव सर्वानुमते मान्य करुन शास्ती योजनेला 31 डिसेंबर 2012 पर्यंत मुदतवाढ देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. महासभेच्या ठरावाची प्रत प्राप्त झाल्यानंतर या ठरावाची तातडीने अंमलबजावणी केली जाईल, असे मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी आज शनिवारी (दि.1) घेतलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान जाहीर केले.

मालमत्ताधारकांनी अप्रिय कारवाई टाळावी- उपमहापौर
या योजनेचा घेणार्‍यांच्या घरपट्टीवर आतापर्यंत दरमहा लागलेली 2 टक्के शास्ती माफ होणार आहे. 1 जानेवारीनंतर मालमत्ताधारकांना चालू कर व थकबाकीवर दरमहा 2 टक्के शास्ती लागणार असून कर न भरल्यास वेळप्रसंगी जप्तीची कारवाईदेखील करण्यात येणार आहे. त्याकरिता मालमत्ताधारकांनी शास्ती माफी योजनेच्या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपमहापौर आनंद चव्हाण यांनी केले आहे.

====================================================================

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.