nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
नांदेड महानगरपालिका केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजने अंतर्गत राष्ट्रीय नदीकृती आराखडा (NRAP) अंतर्गत गोदावरी नदी कायमस्वरुपी प्रदुषणमुक्त करण्यासाठी उपाययोजना करणे करीता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे व सल्लागाराची नेमणुक करणे. || साफसफाईच्या कामाच्या वेळेत बदल बाबत ||  
समाचार

Dated :01-Dec-2012
वाहतूकीला शिस्त लावण्यासाठी आयुक्तही रस्त्यावर 

नांदेड, दि. 1: नांदेड आय केअर चळवळीच्या माध्यमातून आज शनिवारी (दि.1) कलामंदीर परिसरात झालेल्या वाहतूक नियंत्रणाच्या उपक्रमादरम्यान महापालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत हे वाहतुकीच्या कोंडीमागची कारणे शोधण्यासाठी स्वतः सहभागी झाले.

उपक्रमात सहभागी झालेल्या स्वयंसेवकांना सोबत घेऊन त्यांनी बस स्थानक, कलामंदीर परिसर, शिवाजीनगर उड्डानपुल, घामोडीया फॅक्टरी, डॉक्टर लेन तसेच रेल्वे स्थानक परिसरात पायी चालून वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेतला. याप्रसंगी वाह्तूक शाखेचे पोलिस निरिक्षक श्रीरंग निम्मनवाड, हर्षद शहा, प्रविण सोनी, उमाकांत जोशी वसंत मैय्या, गोविंद करवा, राजकुमार वानख़ेडे, रमेश चवरे, सतीश ढवळे, सुनील देशमुख, यांच्यासह ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी व नांदेड आय केअर समूहातील सदस्य सहभागी झाले होते.

शिस्त मोडणार्‍यांना ‘फूल’ देऊन गांधीगिरी या उपक्रमांतर्गत प्रवाशांसाठी वाहतूक विस्कळीत होण्याच्या ठिकाणी ऑटो थांबवून वाहतूक नियमाचे उल्लंघन करणार्‍या चालकांचा स्वयंसेवकांनी गुलाबाचे ‘फूल’ देऊन गांधीगिरी पध्द्तीने सत्कार केला. त्याचबरोबर वाहतूक व्यवस्थेला सहकार्य करण्याचे आवाहन केले. सकाळी 10 ते 11 या वाहतुकीच्या अधिक वर्दळीदरम्यान हा उपक्रम राबवण्यात आल्याने कलामंदीर परिसरात दररोज विस्कळीत होणार्‍या वाहतुकीने आज तासभर सुटकेचा अनुभव घेतला.

====================================================================

====================================================================

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.