nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
प्रगटन – नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड च्या सर्व सेवानिवृत्त /कुटुंब निवृत्त वेतनधारक यांनी हयात रजिष्टरवर सही केलेले नाही अशा सर्व सेवानिवृत्त कर्मचारी यांनी दि. 31.05.2022 पर्यंत मनपा मुख्य ईमारततील लेखा विभाग खोली क्रं. 311 मध्ये येवून हयात रजिष्टरवर सही करणेसाठी अवगत करावे. || मनपा नांदेड, साफसफाईच्या कामाच्या वेळेत बदला बाबत ||  
समाचार

Dated :01-Dec-2012
शुक्रवारचा आठवडी बाजार आता व्हीआयपी ते विष्णुनगर रस्त्यावर भरणार नांदेड, दि. 1: दर शुक्रवारी गोकुळनगर रेल्वे स्टेशन ते व्हीआयपी रस्त्यावर भरणारा आठवडी बाजार आता येत्या शुक्रवारपासून व्हीआयपी रोड ते विष्णुनगरच्या जोड रस्त्यावर (महादेव दाल मिल शेजारुन जाणारा नवा रस्ता क्र. 26) भरणार असल्याची माहिती मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी आज शनिवारी (दि.1) महापलिकेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

रेल्वे स्टेशन ते व्हीआयपी रस्त्यावर भरणार्‍या आठवडी बाजारामुळे वाहतूक, रहदारी व अतिक्रमणाच्या अनेक समस्या निर्माण होत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वी हा बाजार इंदिरा गांधी मैदानाच्या परिसरात (हुतात्मा स्मारकाशेजारी) भरत होता. पुढे गोकुळनगर रेल्वे स्थानक ते व्हीआयपी रस्त्याचे काम झाल्यानंतर भाजी विक्रेत्यांनी हळूहळू या रस्त्यासह शेजारच्या हुतात्मा स्मारक (ज्योती टॉकीज-बिग सिनेमा) ते शिवाजीनगर आणि व्हीआयपी रस्त्यावर बस्तान बसवणे सुरु केले.

या परिसरात भरणार्‍या आठवडी बाजारामुळे रेल्वे स्थानकाला ये-जा करणार्‍या प्रवाशांसह स्टेडियम, शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, शिवाजीनगरची पूर्व बाजू व या परिसराकडे जाणार्‍या रहदारी व वाहतुकीला दर शुक्रवारी मोठ्या प्रमाणावर त्रास होत असल्याचे लक्षात आले. काही वेळा शहरात होणार्‍या मोठ्या समारंभामुळे बाजाराचा दिवस बदलावा लागल्याने नागरिकांची वारंवार गैरसोय होण्याची शक्यता होती. दुसरीकडे स्टेडियमच्या दुसर्‍या बाजूने असलेल्या महादेव दाल मिल ते विष्णुनगर या नव्या जोड रस्त्याचा (रस्ता क्र.26) वाहतूक व रहदारीसाठी फारसा उपयोगही होत नव्हता. त्याकरिता शुक्रवारचा बाजार तेथे नेहमीसाठी स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या शुक्रवारपासून (दि.7 डिसेंबर) या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून गोकुळनगर रेल्वे स्थानक ते व्हीआयपी रोड तसेच शिवाजीनगर परिसरातील रस्त्यावर भाजी विक्रेते व अन्य दुकानदारांनी व्यवसाय केल्यास विशेष पथकाद्वारे सक्तीने हटवून वेळप्रसंगी त्यांचे साहित्य जप्त करण्याची कारवाई केली जाणार जाईल, असा इशारा आयुक्तांनी दिला.

बाजाराच्या दोन्ही टोकावर पार्किंग
नव्या ठिकाणी आठवडी बाजार भरवण्याच्या महापालिकेच्या निर्णयाचे पत्रकारांनीही स्वागत केले असून दर शुक्रवारी बाजारात जाणारी वाहतूक बंद ठेवण्याची सूचना केली. ती आयुक्तांनी तात्काळ मान्य करुन नव्या जागेतील बाजार पसरुन मुख्य रस्त्यावर येऊ नये, याकरिता रस्त्यावरील दोन्ही टोकाच्या ठिकाणी विशिष्ट जागा सार्वजनिक वाहनतळासाठी आखून देण्यात येईल, असेही यावेळी सांगितले. सर्व जनतेने या बदलाची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त जी. श्रीकांत यांनी केले आहे.

====================================================================

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.