nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
नांदेड महानगरपालिका केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजने अंतर्गत राष्ट्रीय नदीकृती आराखडा (NRAP) अंतर्गत गोदावरी नदी कायमस्वरुपी प्रदुषणमुक्त करण्यासाठी उपाययोजना करणे करीता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे व सल्लागाराची नेमणुक करणे. || साफसफाईच्या कामाच्या वेळेत बदल बाबत ||  
समाचार

Dated :01-Dec-2012
गोकुळनगर परिसरात आता सायंकाळी पाणीपुरवठा 


नांदेड, दि.1: महापालिकेच्या गोकुळनगर जलकुंभावरुन सध्या होणार्‍या पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून या जलकुंभाच्या लाभक्षेत्र परिसरात आता सकाळी ऐवजी सायंकाळी 6 वाजता पाणीपुरवठा होईल. नागरिकांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

गोकुळनगर परिसरातील हमालपुरा, विष्णुनगर, दत्तनगर, गोकुळनगर, खोब्रागडेनगर, विसावानगरचा काही भाग, दयानंद नगर, नवीन मोंढा या परिसरात गोकुळनगरच्या जलकुंभावरुन सकाळी 7 वाजता पाणीपुरवठा होत होता. परंतु काही तांत्रीक अडचणीमुळे यात बदल करणे आवश्यक होते. त्याकरिता या परिसरात आता सकाळीऐवजी सायंकाळी सहा वाजता पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची अंमलबजावणी तात्काळ सुरु करण्यात आली असल्याचे महापालिकेच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.