nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
डॉ. राम मनोहर लोहीया ग्रंथालय अंतर्गत चालविण्यात येणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ.शंकरराव चव्हाण अभ्यासिका (सिडको) व स्पर्धा परिक्षा केंद्र (जुना मोंढा) प्रवेश करिता लेखी परीक्षेबाबत जाहीर सुचना ||  
समाचार

Dated :01-Dec-2012
मालमत्ता कर थकवला; सिडकोत दुकानाला सील 


नांदेड, दि. 1: महापालिकेचा मालमत्ता कर थकवणार्‍या दुकानाला शनिवारी (दि.1) मनपा सिडको क्षेत्रिय कार्यालयाच्या वसुली पथकाने सील ठोकले. सहाय्यक आयुक्त गुलाम सादेक व त्यांच्या सहकार्‍यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सिडको क्षेत्रीय कार्यालयांअतर्गंत (क्र.5) मारुति धोंडीबा जाधव (रा. ज्ञानेश्वरनगर, हडको) यांच्या क्र. 11-7-22 या मालमत्तेतील दुकानाच्या मालमत्ता करापोटी त्यांच्याकडे 45414 रुपये थकबाकी येणे होती. महापालिकेने मागणी बील व नोटीसा पाठवूनदेखील संबधितांनी आपल्याकडील कराचा भरणा करण्यास टाळाटाळ केली.
शनिवारी त्यांच्याकडे करवसुली व जप्ती पथक गेल्यानंतरही त्यांनी कराचा भरणा करण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांच्या दुकानाला सील ठोकणात आले. आयुक्त जी. श्रीकांत, अप्पर आयुक्त राम गगराणी, उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक आयुक्त गुलाम सादेक यांच्या नेतृत्वाखाली गौसोद्दीन जहिरोद्दीन, भालचंद्र चामे, अ. हबीब अ. रशीद, रणजित जोंधळे, पदमाकर कावळे, कल्याण घंटेवाड, सोमेश्वर तांबोळी, शिवकुमार ठोंबरे यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. इतर मालमत्तधारकांनीही आपल्याकडील मालमत्ता कर भरुन जप्तीची कारवाई टाळावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.


====================================================================

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.