nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
नांदेड महानगरपालिका केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजने अंतर्गत राष्ट्रीय नदीकृती आराखडा (NRAP) अंतर्गत गोदावरी नदी कायमस्वरुपी प्रदुषणमुक्त करण्यासाठी उपाययोजना करणे करीता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे व सल्लागाराची नेमणुक करणे. || साफसफाईच्या कामाच्या वेळेत बदल बाबत ||  
समाचार

Dated :29-Nov-2012
दुकानदारांनी सायंकाळीच दुकाने झाडावीत- मनपा आयुक्त 

• रस्त्यावर कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई

नांदेड, दि. 29: दुकानदारांनी दररोज सकाळी दुकान उघडल्यानंतर साफसफाई अथवा झाडू काढण्याऐवजी साय़ंकाळीच नियमीतपणे ही कृती करावी, असे आवाहन मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी मनपा क्षेत्रातील सर्व लघु व मोठ्या व्यावसायिकांना केले आहे.

महापालिकेच्या वतीने दररोज सकाळी शहरातील मुख्य व इतर रस्त्यांची साफसफाई केली जाते. स्वच्छता कामगारांनी रस्ते झाडून साफ केल्यानंतर अनेक व्यापारी दुकान उघडतात आणि दुकानातील कचरा गोळा करुन बाहेर रस्त्यावर टाकतात, असे वारंवार निदर्शनास आले आहे. या प्रकारामुळे स्वच्छ केलेल्या रस्त्यासह परिसराच्या सौंदर्याला बाधा येत असून महापालिकेच्या पथकाला अतिरिक्त स्वरुपाचे काम करावे लगत आहे. त्याचबरोबर रस्त्यावर कचरा टाकणार्‍यविरुध्द महापालिका सर्वसाधारण सभेने घेतलेल्या निर्णयानुसार एका वेळी 200 रुपयांपर्यंत दंड आकारण्याची तरतूद असून असा प्रकार पुन्हा-पुन्हा करणार्‍याविरुध्द कायदेशीर कारवाईदेखील करण्यात येणार आहे.

नांदेड शहरात छोटा-मोठा, कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करणार्‍या व्यापार्‍यांनी आपली दुकाने शक्यतो दररोज सायंकाळीच झाडून कचरा उडून इतरत्र पसरु नये, अशा ठिकाणी जमा करुन ठेवावा. जेणेकरुन दुसर्‍या दिवशी महापालिकेच्या स्वच्छता कामगारांना हा कचरा उचलून त्याची योग्य विल्हेवाट लावता येईल. परंतु सकाळी झाडू नये. ज्यांना सायंकाळी झाडणे शक्य नाही, त्यांनी आपल्याकडे स्वतंत्र कचरा संकलन पेटी (डस्ट बीन) ठेवून कचरा गोळा करुन ठेवावा आणि नंतर महापालिकेच्या फिरत्या घंटागाडीला द्यावा, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. परंतु कोणीही रस्त्यावर किंवा उघड्या जागेत कचरा टाकल्याचे आढळले तर त्यांच्याकडून दंड वसुलीची कारवाई सक्तीने करण्यात येणार आहे. यासंबंधात कोणाच्या तक्रारी असतील अथवा काही समस्या असतील तर महापलिकेच्या नियंत्रण कक्षाकडे (दूरध्वनी क्र. 234461) संपर्क करावा, असे महापालिकेच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.