nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
नांदेड महानगरपालिका केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजने अंतर्गत राष्ट्रीय नदीकृती आराखडा (NRAP) अंतर्गत गोदावरी नदी कायमस्वरुपी प्रदुषणमुक्त करण्यासाठी उपाययोजना करणे करीता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे व सल्लागाराची नेमणुक करणे. || साफसफाईच्या कामाच्या वेळेत बदल बाबत ||  
समाचार

Dated :27-Nov-2012
कामचुकार जकात जवानाची बडतर्फी  

मनपा आयुक्तांची आठवड्यातील दुसरी कारवाई

नांदेड, दि. 27: नियुक्तीपासूनच कामचुकारपणा करुन कामावर सतत गैरहजर राहणार्‍या जकात जवानास मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी कायमचे घरी पाठवून त्याची सेवा संपुष्टात आणली आहे. धनंजय बाबूराव रत्नपारखे असे त्याचे नाव असून त्याच्या एकूण 14 पैकी 5 वर्षाच्या सेवाकाळात त्याला तीन वेळा निलंबीत करण्यात आले होते. परंतु कामात कोणतीही सुधारणा झाली नसल्याने महापालिकेस त्याच्या सेवेची गरज नसल्याचा अभिप्राय नोंदवून आयुक्तांनी मंगळवारी आज (दि.27) त्याच्या बडतर्फीचे आदेश काढले आहेत.

आरोग्य शुल्काच्या रक्कमेत अपहार करणार्‍या एका लिपिकावर आयुक्तांनी गेल्या दि. 20 नोव्हेंबर रोजी बडतर्फीची कारवाई केली होती. त्यापाठोपाठ जकात जवानालाही बडतर्फ केल्याने कामचुकार कर्मचार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. धनंजय रत्नपारखे हे 19 मे 1995 रोजी अनुकंपा धर्तीवर जकात जवान म्हणून तत्कालीन नगरपालिकेत रुजू झाले होते. 2000 सालात कर्तव्याच्या वेळी मद्यप्राशन करणे, मनपा रक्कमेचा अपहार करणे आदी गैरशिस्तीबद्दल त्यांच्यावर कारवाईची शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी कर्तव्यावर सतत गैरहजर राहून नंतर आजारी रजा सादर करीत वरिष्ठांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्यामुळे दि. 6 जुलै 2004 रोजी त्यांना निलंबीत करण्यात आले होते.

त्यानंतर सतत गैरहजर राहून नंतर आजारी रजा सादर करण्याचा रत्नपारखे यांचा कार्यक्रम सुरुच होता. त्यामुळे त्यांना दंड आकारुन 24 नोव्हेंबर 2006 व 16 नोव्हेंबर 2009 अशा दोन वेळा त्यांना पुन्हा निलंबित करण्यात आले. रत्नपारखे हे नियुक्तीपासूनच सेवेबाबत एकनिष्ठ नसल्याने तसेच वारंवार संधी देऊनही कामात सुधारणा झाली नसल्याने त्यांना सेवेत ठेवणे मनपाच्या हिताचे नसल्याचा अभिप्राय नोंदवून रत्नपारखे यांची सेवा समाप्त करण्याचे आदेश आयुक्तांनी बजावले आहेत.

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.