nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
डॉ. राम मनोहर लोहीया ग्रंथालय अंतर्गत चालविण्यात येणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ.शंकरराव चव्हाण अभ्यासिका (सिडको) व स्पर्धा परिक्षा केंद्र (जुना मोंढा) प्रवेश करिता लेखी परीक्षेबाबत जाहीर सुचना ||  
समाचार

Dated :27-Nov-2012
संस्काराच्या शिक्षणाला कायद्याची गरज नाही- जोशी 

हुंडाबंदी दिनानिमित्त महापालिकेत कार्यक्रम

नांदेड, दि. 26: दिनचर्येपासून आचरणापर्यंत नित्यनेमाने संस्कारातून होणार्‍या शिक्षणाला कोणत्याही कायद्याची गरज नसते. हुंडा देण्या-घेण्याचा सामाजिक कलंक पुसून परिवर्तन घडवण्यासाठी कायद्यापेक्षा संस्काराची अधिक आवश्यकता आहे, असे प्रतिपादन मनपाचे शिक्षणाधिकारी भागवत जोशी यांनी केले.

हुंडाबंदी दिनानिमित्त सोमवारी (दि.26) महापालिकेच्या सुवर्ण जयंती विभागाच्या वतीने आयोजित बचत गटांच्या महिलांच्या मेळाव्यात ते बोलत होते. महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या तिसर्‍या माळ्यावरील प्रशिक्षण सभागृहात हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी जनसंपर्क अधिकारी गोविंद करवा, स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी ऋषिकेश कोंडेकर, बांधकाम विभागाचे कार्यालय अधिक्षक एन. जी. कुलकर्णी, सावित्रीबाई फुले महिला बचत गट महासंघाच्या अध्यक्षा सौ. सरस्वतीबाई साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी बोलताना गोविंद करवा म्हणाले की, मुलींची संख्या घटल्याने हुंडा पध्दती आता विरुध्द दिशेने वाटचाल करीत आहे. काही समाजात लग्नासाठी वधूकडील मंडळींना वरमंडळीने हुंडा देण्याची वेळ आलेली आहे. भविष्यात अनेक मुलांना लग्नाशिवाय जीवन व्यतीत करावे लागेल. ही वस्तुस्थिती असताना बेटी बचाव सारखे अभियान राबवावे लागते, ही दुर्दैवाची बाब आहे, असे त्यांनी नमूद केले.

ऋषिकेश कोंडेकर यांनी आपल्या भाषणात नारीची पूजा होणार्‍य़ा घरातच लक्ष्मी नांदत अस्ल्याचे दाखले दिले. गेल्या दहा वर्षात हुंडा देण्या व घेण्याची पध्दत बदलली असली तरी मुलगा व मुलगी यांच्या जन्मदराच्या विषमतेकडे सर्वांनी गांभिर्याने पाहण्याची गरज अस्ल्याचे माता व्यक्त केले. यावेळी उपस्थित महिलांना महाराष्ट्र शासनाच्या ‘लोकराज्य’ मासिकाचे वितरण करण्यात आले. प्रकल्प संचालक अशोक सुर्यवंशी यांनी सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले. याप्रसंगी दत्तात्रय गोरपल्ले यांच्यासह सुवर्ण जयंती विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

====================================================================

====================================================================

====================================================================

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.