nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
नांवाशमनपा हदिदत पाण्याच्या टँकर व्यवस्थेबाबत. ||  
समाचार

Dated :27-Nov-2012
हुंडाबंदी दिनानिमित्त महापालिकेत सामूहिक शपथवाचन 


नांदेड, दि. 27: हुंडाबंदी दिनानिमित्त महापालिकेत सोमवारी (दि.26) उपमहापौर आनंद चव्हाण, आयुक्त जी. श्रीकांत, नगरसेवक किशोर भवरे, नगरसेविका डॉ. करुणा जमदाडे, नगरसेविका सौ. ललिता बोकारे यांच्या उपस्थितीत शपथेचे सामूहिक वाचन करुन हुंडाबंदी अभियानासाठी काम करण्याचा सर्वांनी संकल्प केला.
संविधान दिनाला जोडूनच हुंडाबंदी दिनाचा कार्यक्रम सोमवारी महापलिका प्रशासकीय इमारतीत पार पडला.

शासनाच्या वतीने हुंडाबंदी दिनानिमित्त शासकीय कार्यालयात घ्यावयाच्या शपथेचे या कार्यक्रमात सामूहिक वाचन करण्यात आले. आम्ही हुंडा घेणार किंवा देणारही नाही, हुंडाबंदीची सुरुवात स्वतःपासून करतो, आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देतो, हुंड्याचा अवलंब केलेल्या लग्नात जाणार नाही किंवा आदरतिथ्य स्विकारणार नाही, तशा स्वरुपाच्या कोणत्याही बैठकीलाही उपस्थित राहणार नाही, हुंडा पध्दत मोडीत काढून आमच्या मुलामुलींचे लग्न जमवण्याचा तसेच या हुंडाबंदीची अंमलबजावणी इतरांना करायला लावण्याची शपथ या कार्यक्रमात घेण्यात आली.

आयुक्तांनी या शपथेतील मुद्यांचा आपण स्वतः काटेकोर अंगिकार केल्याचे मत उत्स्फुर्तपणे नोंदवताना 2013 मध्ये आपले लग्न होणार असल्याची कल्पना सर्वांना दिली. आपण हुंडा दिला व घेतलेला नाही, तसेच आपला विवाह आंतरजातीय आहे आणि तो प्रेमविवाह असल्याचे नमूद केले. शपथेतील मसुद्यामध्ये हुंडा प्रथेचा अवलंब केलेल्या कुटुंबातील लग्नाला जाणार नाही, असा निर्धार करण्यात आला. आपले लग्न विनाहुंड्याचे असल्याने सर्वांना आपल्या लग्नाला येता येईल, असेही आयुक्तांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमास उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांच्यासह महापालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

====================================================================

====================================================================

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.