nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
 
समाचार

Dated :25-Nov-2012
मालमत्ता कर थकवला; सिडकोत दोन घरांना सील  

नांदेड, दि. 25: महापालिकेचा मालमत्ता कर थकवणार्‍या दोन मालमत्तांना शनिवारी (दि.24) मनपा सिडको क्षेत्रिय कार्यालयाच्या वसुली पथकाने सील ठोकले. सहाय्यक आयुक्त गुलाम सादेक व त्यांच्या सहकार्‍यांच्या पथकाने ही कारवाई केली.
सिडको क्षेत्रीय कार्यालयांअतर्गंत (क्र.5) श्रीमती इंदीराबाई नारायणराव डांगे यांच्याकडे मालमत्ता क्र. 11-4-823 च्या करापोटी 24 हजार 338 रुपये आणि श्रीमती कमलाबाई भगवानराव पांपटवार यांच्याकडे मालमत्ता क्र. 11-7-544 च्या करापोटी 34 हजार 658 येणे होते. महापालिकेने मागणी बील व नोटीसा पाठवूनदेखील संबधितांनी आपल्याकडील कराचा भरणा करण्यास टाळाटाळ केली.
शनिवारी त्यांच्याकडे करवसुली व जप्ती पथक गेल्यानंतरही त्यांनी कराचा भरणा करण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे या दोन्ही मालमत्तांना सील ठोकणात आले. आयुक्त जी. श्रीकांत, अप्पर आयुक्त राम गगराणी, उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक आयुक्त गुलाम सादेक, गौसोद्दीन जहिरोद्दीन, श्रीकांत चौदंते, भालचंद्र चामे, अ. हबीब अ. रशीद, रणजित जोंधळे, दिपक पाटील, संतोष भदरगे, संदीप धोंगडे, मारुति सारंग, वामन पारेकर, प्रभाकर कुलकर्णी, मालू ऐनफळे यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. इतर मालमत्तधारकांनीही आपल्याकडील मालमत्ता कर भरुन जप्तीची कारवाई टाळावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

====================================================================

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.