nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
नांदेड महानगरपालिका केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजने अंतर्गत राष्ट्रीय नदीकृती आराखडा (NRAP) अंतर्गत गोदावरी नदी कायमस्वरुपी प्रदुषणमुक्त करण्यासाठी उपाययोजना करणे करीता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे व सल्लागाराची नेमणुक करणे. || साफसफाईच्या कामाच्या वेळेत बदल बाबत ||  
समाचार

Dated :23-Nov-2012
तंबाखूच्या दोन दुकानावर एलबीटी विभागाच्या धाडी 

उशिरापर्यंत तपासणी सुरुच

नांदेड, दि. 23: जुना मोंढा भागात तंबाखू व तंबाखूजन्य वस्तूंची ठोक तसेच किरकोळ विक्री करणार्‍या दोन दुकानांवर स्थानिक संस्था कर (एलबीटी) विभागाच्या भरारी पथकाने आज शुक्रवारी (दि.23) धाड टाकून तेथील मालाच्या साठ्याचा हिशेब जुळवण्याचे काम सुरु केले आहे. सायंकाळी उशिरापर्यंत तपासणीचे काम सुरु असल्याने या कारवाईतील अधिक तपशिल मात्र कळू शकला नाही.

जुना मोंढा भागात फ्रेंडस ट्रेडर्स हे तंबाखू, पान मसाला व तंबाखूजन्य पदार्थांच्या साहित्य विक्रीचे होलसेल दुकान असून दुकानाचा व्याप मोठा आहे. याच व्यवस्थापनाचे जुना मोंढा कॉर्नरला फ्रेंडस जर्दा स्टोअर्स नावाने किरकोळ विक्रीचे दुकान आहे. ही दोन्ही दुकाने मनपाच्या एलबीटी विभागाकडे नोंदणी झालेली आहेत. त्यांच्याकडून अनियमितपणे विवरणपत्र दाखल करण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर या दोन्ही दुकानांमधील प्रत्यक्ष साठा व साहित्याची विक्री किती होते, याची तपासणी करण्याच्या सूचना मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिल्या. त्यावरुन एलबीटी विभागाच्या सहाय्यक आयुक्त वसुधा फड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शुक्रवारी दुपारी या दोन्ही दुकानांवर धाडी मारुन मालाच्या साठ्याचा हिशेब घेण्यास सुरुवात केली.

साधारणत: अडीच तासापर्यंत ही कारवाई सुरु होती. पथकाने दुकान व दुकानाला जोडून असलेल्या गोदामात उपलब्ध झालेल्या मालाची नोंद घेतली असून त्याप्रमाणे संबधित व्यापार्‍याने यापूर्वी विवरणपत्र दाखल केले असल्यास त्या मालाची व्यापार्‍यांसमक्ष पडताळणी करुन पुढची कारवाई करण्यात येणार असल्याचे सहाय्यक आयुक्त फड यांनी सांगितले.

कोण आहेत हे आसिम भाई?
फ्रेंडस ट्रेडर्स या दुकानामध्ये आसिम भाई वाजेगाव नावाचे 25 आणि 15 डाग असल्याचा उल्लेख असलेलेले काही साहित्याचे बॉक्स आढळल्याने संबधीत दुकानाचे वाजेगाव येथेही मोठे गोदाम असावे, असा पथकाचा संशय आहे. संबधित पोते या दुकानात कसे आले, याच्या अधिक चौकशीनंतर पुढील प्रक्रिया करण्यात येणार आहे.

सांगितली साखर, निघाला मावा
या दुकानाची तपासणी सुरु असताना बाजूच्या बंद असलेल्या शटरकडे पथकाचे लक्ष गेले. तेव्हा या शटरमध्ये काय आहे? असा प्रश्न विचारला असता तेथील व्यक्तीने साखर असल्याचे सांगून ते गोदाम या दुकानाशी संबधीत नसल्याचे सांगितले. परंतु शटरला कुलूप नासून ते उघडेच असल्याचे दिसल्यानंतर पथकाने ते उघडून पाहिले असता त्यात तंबाखूजन्य पदार्थ व मसाल्याचा बाजारभावाप्रमाणे जवळपास 50 लाखाचा साठा आढळला. पथकाच्या नजरेस हे साहित्य पडताच खोटे बोलणार्‍या तो व्यक्ती खजील झाला होता. दुकानामध्ये सिगारेट, तंबाखू, खिमाम, चेरी, सुपारी, मावा व पानटपरीवर लागणारे विविध साहित्य आढळून आले. यातील अनेक साहित्याचा हिशेब विवरणपत्रात दाखल केला नसल्याचे दिसून आल्याचे पथकातील कर्मचार्‍याने सांगितले.

अशी भरावी लागते पान मसाल्यावर एलबीटी
स्थानिक संस्था कर नियमाप्रमाणे पान मसाल्यातील कोणत्याही पदार्थाला एलबीटी करातून सवलत दिली गेलेली नाही. सिगारेट, पान मसाला, खिमाम, चमन व इतर चैनीच्या वस्तूंवर 5 टक्के, बीडीवर प्रती शेकडा 5 रुपये, सुगंधीत जर्दावर 5 टक्के तर सादा जर्दा अस्ल्यास 2 टक्के एलबीटी आकारली जाते.

नंबर तुमचाही लागू शकतो..!
नांदेड शहरात सर्व प्रकारच्या मालाची आयात करणार्‍या व्यापार्‍यांना आपल्या व्यवसायातील उलाढालीचे विवरणपत्र भरणे आवश्यक आहे. सहामाही विवरणपत्र दाखल करण्यासाठी व्यापारी प्रतिष्ठानांना दि. 30 नोव्हेंबर 2012 ही अंतीम मुदत दिली आहे. ज्यांनी अद्यापपर्यंत आपल्या व्यवसायाचा एलबीटी परवाना काढला नाही, त्यांनी तात्काळ परवाना काढून आपल्या व्यवसायाबद्दल माहिती द्यावी, अन्यथा संबधित व्यापारी प्रतिष्ठानांवर छापे टाकून स्थानिक संस्था कर नियमान्वये पुढील कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असा इशारा मनपाच्या वतीने देण्यात आला आहे.

====================================================================

====================================================================

====================================================================

====================================================================

====================================================================

====================================================================

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.