nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
नांवाशमनपा हदिदत पाण्याच्या टँकर व्यवस्थेबाबत. ||  
समाचार

Dated :22-Nov-2012
अपहार करणारा मनपाचा लिपीक सेवेतून बडतर्फ 

आयुक्तांची कारवाई

नांदेड, दि. 22: नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या फंडात जमा शुल्काच्या रक्कमेत अपहार केल्याचा ठपका असलेल्या लिपिक मुस्तफाअली बंद अली यांच्यावरील आरोप विभागीय चौकशीत निष्पन्न झाल्याने त्यांना मनपाच्या सेवेतून कायमचे कमी कमी करण्यात आले आहे. मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी मंगळवारी (दि.20) याबाबतचे आदेश काढले.
मुस्तफा अली हे मनपाच्या आरोग्य विभागात कार्यरत असताना 2008 साली झालेल्या चौकशीत नोंदणी शुल्काच्या रक्कमेत अपहार केल्याच्या आरोपावरुन त्यांना निलंबीत करण्यात आले होते. त्यानंतर नियमातील तरतूदीनुसार मुस्तफा अली यांची विभागीय चौकशी झाली. त्यात त्यांनी 67 हजार 500 रुपयांचा अपहार केल्याचे सिध्द झाले होते. ही बाब लक्षात घेता मुस्तफा अली यांना महापालिका सेवेत ठेवणे हिताचे वाटत नाही, असा अभिप्राय नोंदवून अपहाराच्या संपूर्ण रक्कमेची त्यांच्याकडून वसुली करुन त्यांना महापालिका अधिनियमातील तरतूदीनुसार कायमचे कमी करण्याचे आदेश मनपा आयुक्तांनी काढले आहेत. या कारवाईमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.