nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
नांदेड महानगरपालिका केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजने अंतर्गत राष्ट्रीय नदीकृती आराखडा (NRAP) अंतर्गत गोदावरी नदी कायमस्वरुपी प्रदुषणमुक्त करण्यासाठी उपाययोजना करणे करीता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे व सल्लागाराची नेमणुक करणे. || साफसफाईच्या कामाच्या वेळेत बदल बाबत ||  
समाचार

Dated :22-Nov-2012
सिडकोच्या कार्यालयास सील ठोकले 

करवसुलीसाठी मनपाची धडक मोहिम

नांदेड, दि.22: मालमत्ता कराच्या वसुलीसाठी मनपाने धडक मोहिम सुरु केली असून कराची रक्कम भरण्याकडे दुर्लक्ष करणार्‍या सिडको कार्यालयास महापालिकेच्या वसुली पथकाने गुरुवारी (दि.22) दुपारी सील ठोकले. क्षेत्रीय कार्यालय क्र. 5 चे सहाय्यक आयुक्त गुलाम सादेक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. इतर क्षेत्रीय कार्यालयांतर्गतही वसुली पथक जप्तीसाठी गेले असता संबधित मालमत्ताधारकांनी आपल्याकडील येणे कराचा भरणा पथकाकडे तात्काळ केल्यामुळे त्यांच्यावरील अप्रिय कारवाईचा प्रसंग टाळता आला.

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचा समावेश जेएनएनयुआरएम योजनेत झाल्यानंतर केंद्र शासनाने रिफॉर्म्सचे (करवसुली व देखभाल) निकष ठरवून दिले होते. त्यानुसार महापालिकेने मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुली 90 टक्के करणे बंधनकारक आहे. त्यादृष्टीने विविध क्षेत्रीय कार्यालयांतर्गत विशेष वसुली/जप्ती पथकाची स्थापना करण्यात आली असून करवसुलीचे नियोजन करण्यात आले आहे. मनपा क्षेत्रातील सहाही क्षेत्रीय कार्यालयांतर्गतचे मोठे कर देणेकरी शोधून त्यांच्याकडील येणे रक्कम वसुल करावी. अन्यथा त्यांच्या मालमत्ता सील करण्याची कारवाई सुरु करण्याचे निर्देश महापौर अब्दुल सत्तार, उपमहापौर आनंद चव्हाण, आयुक्त जी. श्रीकांत यांनी मनपा यंत्रणेला दिले होते.
त्यानुसार सिडको क्षेत्रीय कार्यालयांअतर्गंत (क्र.5) मालमत्ता क्र. 11-2-983 व 984 तसेच 11-6-1017, 11-4-145 अशा चार मालमत्ता सिडको कार्यालयाच्या आहेत. संबधित मालमत्तेवर मागील व चालू वर्षी मिळून 1 लाख 25 हजार 783 रुपये येणे बाकी आहे. कराच्या वसुली संदर्भात मनपाने अनेक वेळा नोटीस बजावूनही संबधित कार्यालयाने त्यांच्याकडील मालमत्ता कर भरण्याकडे दुर्लक्ष केले.

अप्पर आयुक्त राम गगराणी, उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक आयुक्त गुलाम सादेक यांच्या नेतृत्वाखाली जप्ती पथकातील गौसोद्दीन जहिरोद्दीन, श्रीकांत चौदंते, भालचंद्र चामे, अ. हबीब अ. रशीद, रणजित जोंधळे, दिपक पाटील, व्यंकट गायकवाड, मालू ऐनफळे यांनी सिडकोचे कार्यालय सील केले. अन्य पाच क्षेत्रीय कार्यालयांतर्गतही विशेष वसुली मोहिम सुरु असून अनेक मोठ्या व प्रतिष्ठीत करदात्यांकडे पथक वसुलीसाठी पोहचल्यानंतर त्यांनी आपल्याकडील येणे कराचा भरणा तात्काळ केला. त्यामुळे त्यांच्या मालमत्तेवर कोणतीही अप्रिय स्वरुपाची कारवाई करण्यात आली नाही. सर्व मालमत्ताधारकांनी आपल्याकडील मालमत्ता कर वेळेवर भरुन जप्तीची कारवाई टाळावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

====================================================================

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.