nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
नांदेड महानगरपालिका केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजने अंतर्गत राष्ट्रीय नदीकृती आराखडा (NRAP) अंतर्गत गोदावरी नदी कायमस्वरुपी प्रदुषणमुक्त करण्यासाठी उपाययोजना करणे करीता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे व सल्लागाराची नेमणुक करणे. || साफसफाईच्या कामाच्या वेळेत बदल बाबत ||  
समाचार

Dated :22-Nov-2012
नागरिकांनी गुंठेवारी शुल्क भरुन मालमत्ता नियमित कराव्यात- उपमहापौर 

नांदेड, दि. 22: मनपा हद्दीत 2001 पूर्वी बांधकाम किंवा अनाधिकृत लेआऊट केलेल्या मालमत्ताधारकांनी 31 डिसेंबर 2012 पूर्वी गुंठेवारी शुल्क भरुन आपल्या मालमत्ता व त्यावरील बांधकाम नियमीत करावे, असे आवाहन उपमहापौर आनंद चव्हाण यांनी केले आहे.

शहरातील 16 हजार मालमत्ताधारकांनी महानगरपालिकेची परवानगी न घेता 2001 पूर्वी खुल्या भूखंडाचे अनाधिकृत लेआऊट केल्याचे तथा यातील बहुतांश जणांनी त्या जागेवर इमारत बांधकाम केल्याचे महापालिकेच्या पाहणीत आढळले होते. राज्य शासनाने 2001 पूर्वी भूखंड पाडून मनपा अनाधिकृत ले आऊटच्या आधारे मालमत्तेवर बांधकामे करणार्‍या मालमत्ताधारकांना गुंठेवारी शुल्क भरुन त्यांच्या मालमत्ता नियमीत करण्याची संधी दिली होती.

त्यानुसार 2005-06 मध्ये मनपा क्षेत्रात गुंठेवारी वसाहतीच्या केलेल्या सर्वेक्षणात तब्बल 20 ते 22 हजार बांधकामे अनाधिकृत भूखंड अभिन्यासाआधारे केल्याचे आढळून आले होते. संबधीत मालमत्ताधारकांना मनपाकडे गुंठेवारी शुल्क भरुन त्यांची नियमीत करण्याची संधी महापालिकेने दिली होती. गेल्या 31 मार्च 2012 पर्यंत गुंठेवारी करण्याचे प्रस्ताव संबधित मालमत्ताधारकांकडून मागवले होते. त्यातील पाच हजार मालमत्ताधारकांनी शुल्क भरुन मुदतीत आपल्या मालमत्ता नियमित केल्या होत्या. तर 960 लोकांनी प्रस्ताव दाखल केल्यानंतर शुल्क भरले नाही, त्यामुळे त्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. उर्वरीत 16 हजार मालमत्ताधारकांना शुल्क भरण्यासाठी येत्या दि. 30 डिसेंबर 2012 ही शेवटची संधी उपलब्ध करुन दिली आहे.

या मुदतीत गुंठेवारी शुल्क भरुन नागरिकांनी बांधकामे नियमीत केली नाही तर त्यांच्या मालमत्ता पाडून त्यावर होणारा खर्च त्यांच्या मालमत्तेतून वसूल करण्यात येणार असल्याने नागरिकांनी आपल्यावर होणारी संभाव्य अप्रिय कारवाई टाळण्यासाठी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपमहापौर चव्हाण यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संबधीत मालमत्ताधारकांनी महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील कक्ष क्र. 309 येथे संपर्क करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

====================================================================

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.