nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
नांदेड महानगरपालिका केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजने अंतर्गत राष्ट्रीय नदीकृती आराखडा (NRAP) अंतर्गत गोदावरी नदी कायमस्वरुपी प्रदुषणमुक्त करण्यासाठी उपाययोजना करणे करीता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे व सल्लागाराची नेमणुक करणे. || साफसफाईच्या कामाच्या वेळेत बदल बाबत ||  
समाचार

Dated :21-Nov-2012
जिल्हा क्रीडा अधिकार्‍यांच्या कार्यालयास सील 

13 लाखाचा मालमत्ता कर थकवला

नांदेड, दि. 21: गेल्या सात वर्षापासून सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही महापालिकेचा मालमत्ता कर भरण्यास टाळाटाळ करुन आतापर्यंत 13 लाख 42 हजार रुपयांचा कर थकवणार्‍या जिल्हा क्रीडा समितीच्या कार्यालयास महापालिकेने आज बुधवारी (दि.21) सील ठोकले. आयुक्त जी. श्रीकांत, उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली अशोकनगर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त अविनाश आटकोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

श्री गुरुगोविंदसिंघजी स्टेडियम परिसरात जिल्हा क्रिडा संकुल समितीची इमारत असून तेथे जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे कार्यालय व बॅटमिंटन हॉल असा वापर सुरु आहे. सदर इमारत, वस्तीगृह अशा मालमत्तेपोटी 2005 पासून समितीकडे मालमत्ता कर थकित आहे. समितीला वार्षिक सरासरी दीड लाख रुपये इतका मालमत्ता कर आकारण्यात येत असून त्याची आतापर्यंतची शास्तीसह रक्कम 13 लाख 42 हजार 357 रुपये इतकी भरते. समितीला शास्ती माफी योजनेचा लाभ घेण्याचेही पत्राद्वारे कळवण्यात आले आहे. परंतु समितीकडून अद्यापपर्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. समितीने शास्ती माफी योजनेचा लाभ घेतला तर थकित करातून त्यांना साधारणत: 3 लाख 25 हजार रुपयांची सूट मिळू शकेल. गेल्या अनेक वर्षापासून समितीने मालमत्ता कर व थकबाकी भरण्यासाठी महापालिकेचा पाठपुरावा सुरु होता. परंतु संबधितांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने महापालिकेला आज हे पाऊल उचलावे लागले. या मोहिमेत कार्यालय अधिक्षक बी.जी. डांगे गणेश गुंडावार, शेषराव पातकुटवार, बी. एस. एकलारे आशिर्वाद चव्हाण व इतरांचा समावेश होता.

====================================================================

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.