nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
नांदेड महानगरपालिका केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजने अंतर्गत राष्ट्रीय नदीकृती आराखडा (NRAP) अंतर्गत गोदावरी नदी कायमस्वरुपी प्रदुषणमुक्त करण्यासाठी उपाययोजना करणे करीता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे व सल्लागाराची नेमणुक करणे. || साफसफाईच्या कामाच्या वेळेत बदल बाबत ||  
समाचार

Dated :21-Nov-2012
एलबीटी भरण्यात दिरंगाई; तीन दुकानांवर कारवाई 

• रेणुकादेवी गॅस एजन्सीला पुन्हा सील
• बीअर शॉपी व आयुर्वेदीक औषधी दुकानाचाही समावेश
नांदेड, दि. 21: महापालिकेचा स्थानिक संस्था कर (एलबीटी) भरण्यात दिरंगाई करणार्‍या तीन दुकानांना सहाय्यक आयुक्त सौ. वसुधा फड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बुधवारी (दि.21) सील ठोकले. या कारवाईत यापूर्वी सील ठोकलेल्या रेणुकादेवी गॅस एजन्सी तसेच एक बीअर शॉपी व एका आयुर्वेदिक औषधी दुकानाचा समावेश आहे.
मनपा क्षेत्रातील व्यापारी प्रतिष्ठानांकडील एलबीटी कराच्या वसुलीसाठी महापौर अब्दुल सत्तार, उपमहापौर आनंद चव्हाण, आयुक्त जी. श्रीकांत यांच्या सूचनेवरुन महापालिकेने विशेष मोहिम सुरु केली असून त्याकरिता खास पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकाने दोन आठवड्यापूर्वी रेणुकादेवी गॅस एजन्सीवर धाड टाकून त्यांच्याकडून विविध टप्प्यातील 35 लाखाच्या धनादेशाची वसुली केली होती. सदर धनादेश मनपाने विहित तारखेत बॅंकेत वठवण्यासाठी पाठवले असता संबधित एजन्सीच्या खात्यात रक्कम नसल्याने ते धनादेश परत आले होते. त्यामुळे रेणुकादेवी गॅस एजन्सीला नुकतेच सील ठोकण्यात आले होते.
दुसर्‍या दिवशी त्यांच्या व्यवस्थापकाने आयुक्तांना समक्ष भेटून पैसे भरण्यासाठी 48 तासाची मुदत व सील काढण्याची मागणी केली असता आयुक्तांनी ती मान्य केली व त्यानंतर सील काढण्यात आले होते. संबधित गॅस एजन्सीने दिलेल्या धनादेशानुसार आजअखेर मनपाचे त्यांच्याकडून 15 लाख रुपये येणे आहे. आयुक्तांनी दिलेली मुदत संपूनही गॅस एजन्सी व्यवस्थापनाने कराची रक्कम भरण्यास प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे मनपा पथकाने या दुकानाला आज दुसर्‍यांदा सील ठोकून दुकानाच्या चाव्या व्यवस्थापकाच्या स्वाधीन केल्या. कराची संपूर्ण रक्कम रोख स्वरुपात भरल्याशिवाय आता कोणत्याही स्थितीत सील उघडणार नसल्याचे सहाय्यक आयुक्त सौ. फड यांनी सांगितले.
विशेष पथकाने याच वेळी व्हीआयपी रोडवरील सोनू बीअर शॉपी यांनी त्यांच्याकडील स्थानिक संस्था कर भरला नसल्याने आणि चिखलवाडी चौकातील पतंजली औषधालय व चिकित्सालय यांनी एलबीटी विभागाकडे व्यवसायाची नोंदणी केली नसल्याच्या कारणावरुन या दोन दुकानालाही सील ठोकले. या मोहिमेत सौ. फड यांच्यासह तानाजी कानोटे, मंजुळदास सोळंके, विलास गजभारे, आर. एच. लोहिया, गोविंदसिंह चौधरी, स. अबचलसिंघ, व्यंकट कल्याणकर, चालक सत्तार यांचा समावेश होता.

====================================================================

====================================================================

====================================================================

====================================================================

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.