nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
डॉ. राम मनोहर लोहीया ग्रंथालय अंतर्गत चालविण्यात येणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ.शंकरराव चव्हाण अभ्यासिका (सिडको) व स्पर्धा परिक्षा केंद्र (जुना मोंढा) प्रवेश करिता लेखी परीक्षेबाबत जाहीर सुचना ||  
समाचार

Dated :28-Apr-2014
दुस-या दिवशी बांधकाम अभियंत्यांना मनपातर्फ़े भुकंप प्रतिरोधक प्रशिक्षण 


नांदेड, दि.28: महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्राच्या वतीने सुरु असलेल्या भुकंप प्रतिरोधक बांधकाम प्रशिक्षण कार्यशाळेत दुस-या दिवशी (दि.28) नांदेड शहरातील बांधकाम अभियंत्यांना मार्गदर्शन करण्यात आले. उद्या मंगळवारी (दि.29) महापालिका क्षेत्रातील गवंडी आणि बांधकाम ठेकेदारांच्या प्रशिक्षणाने या कार्यशाळेची सांगता केली जाणार आहे. या कार्यशाळेचा सर्व संबधितांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

नांदेड शहर हे भुकंपप्रवण क्षेत्रात मोडत असल्यामुळे भविष्यात प्रत्येक इमारतींचे भुकंप प्रतिरोधक बांधकाम अत्यावश्यक राहणार आहे. त्याकरिता नांदेड शहरातील सर्व बांधकाम व्यावसायिक, संबंधित अभियंते, गुत्तेदार व गवंडी यांना दि. 27 ते 29 एप्रिल 2014 यादरम्यान टप्प्याटप्याने महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीच्या तिस-या माळ्यावरील प्रशिक्षण सभागृहात भूकंप प्रतिरोधक बांधकाम प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम सुरु आहे.

सोमवारी (दि.28) झालेल्या कार्यशाळेत पुण्याच्या लोणार फाऊंडेशनच्या प्रशिक्षिका तसेच पदव्युत्तर वास्तुविशारद सौ. सुजाता कोदाग तसेच हैदराबादच्या आयआयआयटी संस्थेतील तज्ञ श्री. तिवारी यांनी भूकंप प्रतिरोधक इमारतींच्या बांधकामासोबत कौशल्याबाबतही मार्गदर्शन केले. कार्यशाळेत भुकंप प्रतिरोधक बांधकामात सिमेंट, गजाळी, काँक्रीट यांचा नेमका वापर व मजबुत बांधकाम याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित अभियंत्यांना भूकंप प्रतिरोधक बांधकामाची सुरक्षितता सप्रमाण निदर्शनास आणून देण्यात आली.

याप्रसंगी एम.जी.एम. अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक डॉ. अर्शद खुर्शीद हाश्मी यांनीही भूकंप प्रतिरोधक बांधकामाच्या कौशल्याचे विवेचन केले. भविष्यात नांदेड शहरातील सर्व बांधकाम अभियंत्यांनी भूकंप प्रतिरोधक बांधकाम करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहीत करण्यासाठी मनपाच्या संयुक्त सहकार्याने व्यापक कार्यशाळा घेण्याचा मानस यावेळी व्यक्त केला.
कार्यशाळेस मनपा उपायुक्‍त राजेंद्र खंदारे, कार्यकारी अभियंता डी. डी. कोळेकर व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. मिर्झा फरहतुल्ला बेग यांच्यासह विविध विभागाचे उपअभियंते, कनिष्ट अभियंते, नांदेड शहरामधील खाजगी आर्किटेक्टस, स्थापत्य अभियंते यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री. राजु, सोमेश्वर तांबोळी व आपत्ती व्यवस्थापन कक्षातील इतर कर्मचा-यांनी पुढाकार घेतला.

====================================================================

====================================================================

====================================================================

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.