nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
डॉ. राम मनोहर लोहीया ग्रंथालय अंतर्गत चालविण्यात येणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ.शंकरराव चव्हाण अभ्यासिका (सिडको) व स्पर्धा परिक्षा केंद्र (जुना मोंढा) प्रवेश करिता लेखी परीक्षेबाबत जाहीर सुचना ||  
समाचार

Dated :20-Nov-2012
विवरणपत्र दाखल करा, अन्यथा दुकानांची तपासणी 

मनपाच्या स्थानिक संस्था कर विभागाचा इशारा

नांदेड, दि.20: मनपा हद्दीतील व्यापारी प्रतिष्ठानांनी येत्या 30 नोव्हेंबर 2012 पर्यंत आपले विवरणपत्र दाखल केले नाही, तर अशा दुकानांची विशेष पथकांमार्फत तपासणी करुन त्यांच्याविरुध्द तरतूदीनुसार कारवाई करण्याचा इशारा स्थानिक संस्था कर विभागाच्या सहाय्यक आयुक्त सौ. वसुधा फड यांनी दिला आहे. स्थानिक संस्था कर नियम 2010 नुसार सर्व व्यापा-यांना आपल्याकडील व्यवसायाचे सहामाही विवरणपत्र मनपाच्या स्थानिक संस्था कर (एलबीटी) विभागाक़डे विहित मुदतीत दाखल करणे आवश्यक आहे. नुकतीच झालेली मनपा निवडणूक व इतर सणांमुळे व्यापार्‍यांना विवरणपत्र दाखल करण्यास वेळ मिळाला नव्हता. त्यामुळे येत्या 30 नोव्हेंबर 2012 पर्यंत व्यापार्‍यांना सन 2012-13 चे सहामाही विवरणपत्र दाखल करण्याची संधी एलबीटी विभागाने उपलब्ध करुन दिली आहे. परंतु बहुतांश व्यापार्‍यांनी त्यांच्या प्रतिष्ठानांचे सहामाही विवरणपत्र दाखल केलेले नसल्याचे निदर्शनास आले आहे.
ज्या व्यापार्‍यांनी विवरणपत्रे अद्यापपर्यंत दाखल केलेली नाहीत, अशा व्यापार्‍यांच्या दुकान तपासणीची मोहिम विशेष पथकांमार्फत हाती घेण्याची सूचना मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी केली आहे. त्यानुसार लवकरच ही मोहिम सुरु केली जाणार आहे. ज्यांनी मुदतीत विवरणपत्र सादर केलेले नाही, अशांक़डून निर्धारित कराबरोबरच स्थानिक संस्था कर नियम 2010 अंतर्गत इतर कारवाई करण्यात येणार आहे. सर्व व्यापार्‍यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

====================================================================

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.