nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
जाहिर लिलाव सूचना : - नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हददीतील तयबाजारी, आठवडी बाजार, दैनिक जमिन भाडे (नो हॉकर्स झोन वगळून) भाडे वसुलीचा मक्ता ताबा देणे बाबत. || नांवाशमनपा जाहीर सुचना ||  
समाचार

Dated :20-Nov-2012
शास्ती माफी योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा- महापौर  

नांदेड, दि. 20: नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने जाहीर केलेल्या 100 टक्के शास्ती माफी योजनेचा सर्व मालमत्ताधारकांनी लाभ घेऊन आपल्याकडील येणे असलेल्या सर्व मालमत्ताकराचा (घरपट्टी) भरणा 30 नोव्हेंबर 2012 पूर्वी करावा, असे आवाहन महापौर अब्दुल सत्तार यांनी केले आहे.
शहरातील मालमत्ताधारकांकडून येणे असलेल्या संपूर्ण कराचा भरणा 30 नोव्हेंबर 2012 पूर्वी केल्यास करावर आकारण्यात येणारी शास्ती 100 टक्के माफ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने घेतला आहे. त्यानुसार मनपा प्रशासनाने त्याची अंमलबजावणी सुरु केली आहे.
ही योजना जाहीर झाली नसती तर मालमत्ताधारकांना त्यांच्याकडील मालमत्ता करावर दरमहा 2 टक्के शास्ती आकारण्यात येणार होती. परंतु मालमत्ताधारकांच्या खास आग्रहावरुन महापालिकेने शास्ती माफीची शेवटची संधी उपलब्ध करुन दिली असून अशी संधी पुन्हा मिळणार नाही. महापालिका क्षेत्रातील सर्व विकासकामे ही नागरिकांकडून मिळणार्‍या करांवर अवलंबून असतात. आपला कर वेळेवर भरणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. तेंव्हा सर्व मालमत्ताधारकांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्याकडील येणे असलेल्या सर्व कराचा भरणा आजच करावा, असे आवाहन महापौर अब्दुल सत्तार यांनी केले आहे.

====================================================================

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.