nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
सन्माननीय सदस्य व स्विकृत सदस्य यादी ||  
समाचार

Dated :17-Nov-2012
मा.महापौर यांची बीएसयुपी आढावा बैठक, दि.16.11.2012 

‘रखडलेली कामे पुन्हा सुरु करा’
‘बीएसयुपी’त आधी घरकुल, नंतरच पायाभूत सुविधा
 महापौर अ. सत्तार यांची सूचना
नांदेड, दि. 17: निवडणुकीच्या कालावधीत थांबवलेली बीएसयुपीची (नागरी गरिबांसाठी मुलभूत सुविधा) कामे पुन्हा तातडीने सुरु करुन कामांना गती द्यावी. लाभार्थ्यांचे घरकुल आधी करुन नंतरच संबधीत ठेकेदाराला पायाभूत सुविधेच्या कामाचे रेखांकन (मार्कआऊट) द्यावे, अशी सूचना महापौर अब्दुल सत्तार यांनी शुक्रवारी (दि.16) बीएसयुपी विभागाच्या आढावा बैठकीत केली. उपमहापौर आनंद चव्हाण, उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांच्यासह बीएसयुपी विभागातील अधिकार्‍य़ांची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी बोलताना महापौर सत्तार म्हणाले, की बीएसयुपीचा खर्‍या लाभार्थ्यांनाच लाभ मिळाला पाहिजे तसेच निधीचा योग्य विनियोग झाला पाहिजे, याकरिता यंत्रणेने दक्ष राहून काम करावे. ज्या लाभार्थ्यांनी अद्याप लोकवाटा भरला नाही, परंतु ते गेल्या वर्षभरापासून बीएसयुपींच्या घरांमध्ये राहत आहेत, अशांकडून सक्तीने लोकवाट्यांची वसुली करावी. अगदी माझ्या स्वत:च्या प्रभागापासून या मोहिमेची सुरुवात करावी. महापालिकेच्या महसूल वसुलीच्या कामात कोणताही नगरसेवक अडथळा आणणार नाही, याची आपण खबरदारी घेऊ. मिल्लतनगर, श्रावस्तीनगर, लालवाडी, ताजनगर, विश्वनाथनगर भागातील अपूर्ण कामे तातडीने सुरु करावी, अशी सूचना महापौरांनी यावेळी केली.
साडेनऊ हजार घरांची कामे पूर्ण
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेस बीएसयुपीअंतर्गत 27 हजार 985 घरे मंजूर झाली असून त्यात वास्तव्य करणार्‍या लाभार्थ्यांना पायाभूत सुविधेसाठी आवश्यक तो निधी उपलब्ध आहे. यापैकी 5 हजार 136 घरे एनटीसी मिलच्या जागेवर उभी असून 1 हजार 678 घरे ब्रम्हपुरी भागात उभारण्यात येणार आहेत. ब्रम्हपुरीतील काम लवकरच सुरु केले जाणार असून एनटीसीच्या जागेबाबत केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी प्रस्ताव प्रलंबीत आहे. उर्वरीत 21 हजार 171 पैकी 14 हजार घरांचे मार्कआऊट देण्यात आले आहेत. यातील 9 हजार 581 घरांची कामे पूर्ण झाली असून 4 हजार 419 घरांची कामे प्रगतीपथावर आहेत. डिसेंबर 2012 अखेर 2 हजार 389 घरांचे काम पूर्ण करुन नवीन 1 हजार 635 घरांना मार्कआऊट देण्याचे उद्दीष्ट आहे. तर मार्च 2013 अखेर आणखी 2 हजार 481 घरांची कामे पूर्ण करुन अन्य 1 हजार 161 घरांचे मार्कआऊट देण्याचे नियोजन आहे, अशी माहिती उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांनी या बैठकीत दिली.
पैसा परत जाऊ देऊ नका- चव्हाण
उपमहापौर आनंद चव्हाण यांनी बीएसयुपी योजनेतील एकही पैसा परत जाण्याची वेळ येऊ नये, याकरिता अधिकारी व यंत्रणेने खबरदारी घेण्याची सूचना केली. पुढील महिण्यात बीएसयुपी विभागाचे नवी दिल्ली येथील पथक योजनेच्या अंमलबजावणीची माहिती घेण्यासाठी येण्याची शक्यता आहे. तेंव्हा यंत्रणेने योजनेची कामे अंतीम टप्प्यात असल्याची पूर्वतयारी सुरु करावी. बीएसयुपी लाभक्षेत्रात छोट्या नाल्याऐवजी मोठ्या नाल्या बांधून महापालिकेच्या नाल्या सदैव वाहत्या राहिल्या पाहिजेत याची कटाक्षाने काळजी घ्यावी, असे उपायुक्त वाघमारे यांनी यावेळी सांगितले.

====================================================================

====================================================================

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.