nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
सन्माननीय सदस्य व स्विकृत सदस्य यादी ||  
समाचार

Dated :01-Nov-2012
नांदेड महापालिकेच्या महापौरपदी अब्दुल सत्तार आणि उपमहापौरपदी आनंद चव्हाण  

नांदेड महापालिकेच्या महापौरपदी अब्दुल सत्तार आणि उपमहापौरपदी आनंद चव्हाण यांची गुरुवारी (ता. एक) निवड झाली. या निवडणुकीत कॉंग्रेसला 52 तर शिवसेनेला 16 मते मिळाली. एमआयएम आणि संविधान पक्षाचे सदस्य मतदानाच्या प्रक्रियेत तटस्थ राहिले.

नांदेड महापालिकेच्या शंकरराव चव्हाण सभागृहात गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता पीठासीन अधिकारी धीरजकुमार यांच्या उपस्थितीत विशेष सभेला सुरवात झाली. यावेळी सर्वच्या सर्व 81 नवनिर्वाचित सदस्यांसह आयुक्त जी. श्रीकांत, नगर सचिव पी. पी. बंकलवाड व इतर अधिकारी उपस्थित होते.

सुरवातीला उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी झाली. त्यानंतर महापौरपदासाठी निवडणूक घेण्यात आली. अर्ज मागे घेण्यासाठी अवधी दिल्यानंतर दिलीप कंदकुर्ते (कॉंग्रेस), अब्दुल हबीब बागवान (एमआयएम) आणि गफारखान (राष्ट्रवादी) यांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे महापौरपदासाठी अब्दुल सत्तार (कॉंग्रेस) आणि बालाजी देशमुख कल्याणकर (शिवसेना) हे दोनच उमेदवार शिल्लक राहिले. त्यानंतर हात उंचावून मतदान घेण्यात आले. त्यानंतर मतमोजणी करून सदस्यांची नावे आणि स्वाक्षरी घेण्यात आली. सत्तार यांना 52 तर कल्याणकर यांना 16 मते पडली. या मतदान प्रक्रियेत एमआयएमचे 11 आणि संविधान पक्षाचे दोन असे 13 सदस्य तटस्थ राहिले. राष्ट्रवादीच्या दहा आणि एकमेव अपक्ष असलेल्या रजिया अय्युबखान यांनी कॉंग्रेसच्या उमेदवाराला मतदान केले तर भाजपच्या दोन सदस्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान केले.

महापौरांच्या निवडीनंतर उपमहापौरपदाची निवडणूक याच पद्धतीने घेण्यात आली. अर्ज मागे घेण्यासाठी वेळ दिल्यानंतर फारूखअली खान (कॉंग्रेस), फारूख हुसेन (एमआयएम) आणि गफारखान (राष्ट्रवादी) या तिघांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आनंद चव्हाण (कॉंग्रेस) आणि सुदर्शना खोमणे (शिवसेना) यांच्यात सरळ लढत झाली. चव्हाण यांना महापौरांप्रमाणेच मते पडली.

====================================================================

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.