नांदेड, दि. 5: दैनंदिन साफसफाईचे काम नियमीत सुरु ठेवून महापलिकेने शहरातील उत्तर भागात सुरु केलेली विशेष स्वच्छता मोहिम मंगळवारी (दि.5) संपली असून आता उद्या दि. 6 फेब्रुवारीपासून (शुक्रवारी) दक्षिण नांदेडातील तीन झोनमध्ये ही मोहिम राबवण्यात येणार आहे.
दि. 15 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2013 यादरम्यान गणेशनगर, अशोकनगर व तरोडा क्षेत्रिय कार्यालयांतर्गत विशेष स्वच्छता मोहीम घेण्यात आली. याअंतर्गत तिन्ही क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्र.1 ते 18 मधील अंतर्गत नाले सफाई व उपद्रवकारक झुडपे काढून घेण्याचे काम सकाळी 7 ते दुपारी 4 या वेळेत करुन घेण्यात आले.
महापौर अब्दुल सत्तार अब्दुल गफुर, आयुक्त जी.श्रीकांत, उपमहापौर आनंद चव्हाण, सभापती गणपत धबाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त (स्वच्छता) संजय जाधव, क्षेत्रिय अधिकारी प्रकाश येवले, अविनाश अटकोरे, मोहन डिंकाळे, स्वच्छता निरिक्षक राजेंद्र गंदमवार, जिलानी पाशा, एम.ए.समी, व्ही.बी.कल्याणकर, बालाजी देसाई, गणेश मुदीराज, , कु.पियंका एंगडे, रणजीत मवाडे, वाहन चालक अब्दूल सत्तार , ए टू झेड कंपनीचे प्रतिनिधी किशन वन्नाळे, सर्व झोनल व सुपरवायझर यांनी विशेष स्वच्छता मोहीम यशस्वी करण्यास परिश्रम घेतले. मोहिमेच्या प्रसंगी त्या-त्या वार्डातील नगरसेवक उपस्थित होते.
आता येत्या दि. 6 फेब्रुवारी ते 4 मार्च 2013 दरम्यान इतवारा, वजिराबाद व सिडको क्षेत्रिय कार्यालय (क्र.3, 4 व 5) अंतर्गत प्रभाग क्र.19 ते 40 मध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.