नांदेड, दि. 5: उपद्रवकारक कृत्य केल्याबद्दल मंगळवारी (दि. 5) शहरातील 20 व्यावसायिकांकडून अशोकनगर क्षेत्रिय कार्यालयाच्या विशेष स्वच्छता पथकाने रस्त्यावर किंवा सार्वजनिक जागेत कचरा टाकणा-या अथवा थुंकणा-या 14 लोकांकडून चार हजार 300 रुपयांचा दंड वसूल केला.
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीत उपद्रवकारक कृत्य करणा-याविरुध्दि अशोकनगर क्षेत्रिय कार्यालयाने दर मंगळवारी दंडात्मवक कारवाई करण्यााचे निश्चित केले आहे. त्यानुसार आयुक्ता जी.श्रीकांत यांच्याळ मार्गदर्शनाखाली सदर मोहिमेत सहाय्यक आयुक्ता संजय जाधव, क्षेत्रिय अधिकारी अविनाश अटकोरे यांच्या सूचनेने स्वच्छता निरिक्षक व्हीह.बी.कल्या णकर यांनी आनंदनगर भागातून 700 रुपये, बालाजी देसाई यांनी कैलासनगर भागातून 700 रुपये, एम. ए. समी यांनी बालाजीनगर भागात एक हजार, गणेश मुदीराज यांनी गोकुळनगर भागात एक हजार 900 रुपये असा एकूण 4 हजार 300 रुपयांचा दंड वसूल केला.