nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
नांवाशमनपा हदिदत पाण्याच्या टँकर व्यवस्थेबाबत. ||  
समाचार

Dated :01-Feb-2013
आधार ओळखपत्राची नोंदणी आता सेतु केंद्रातही : गगराणी 

शहरातील पाच केंद्रावर सुरुवात

नांदेड, दि. 1: शहरातील आधार ओळखपत्र नोंदणी मोहिमेची परिस्थिती सुधारण्यासाठी आता सेतु केंद्रांतही आधार नोंदणीची सुविधा नि:शुल्क स्वरुपात उपलब्ध करण्यात आली आहे, अशी माहिती मनपाचे अप्पर आयुक्त तथा नोडल ऑफिसर रा. ल. गगराणी यांनी दिली.

गेल्या दोन महिण्यापासून शहरात आधार ओळखपत्र नोंदणी मोहिमेचा दुसरा टप्पा सुरु असून नागरिकांची आधार केंद्रावर गर्दी होत आहे. नोंदणी कीटच्या उपलब्ध क्षमतेनुसार जास्तीत जास्त नागरिकांची आधार नोंदणी करण्याचा महापालिकेचा प्रयत्न सुरु असून मुंबईच्या अलंकित कंपनीचे त्याकरिता सहकार्य मिळत आहे. शहरात एकूण 11 ठिकाणी आधार नोंदणी केंद्रे सुरु असून दररोज एका कीटमागे 40 ते 50 रहिवाश्यांची नोंदणी करण्याचे उद्दीष्ट आहे.

सेतु केंद्रात संगणक, ऑपरेटर, प्रिंटर अशा नोंदणीकरिता लागणा-र्या महत्वाच्या सुविधा उपलब्ध असल्याने शासनाने सेतु केंद्रातही आधार नोंदणी सुरु करण्याची मुभा दिली आहे. त्यानुसार शहरातील प्रकाश जेसू (श्री कॉम्पुटर अँकडमी, रंगार गल्ली), गणेश म्याकल (गणेश फोटो स्टुडिओ, मील रोड, वजिराबाद), दत्तप्रसाद असोरे (आशिर्वाद सेतु केंद्र, राज कॉर्नर, तरोडेकर चौक), नागनाथअप्पा स्वामी (जयभारत सेतु केंद्र, हडको, नविन नांदेड) आणि अजयकुमार जाजू (सेतु केंद्र, चिखलवाडी कॉर्नर, जी. जी. रोड, लाठकर कॉम्प्लेक्स) अशा पाच ठिकाणी आधार ओळखपत्र नोंदणीची मोफत सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. सदर सेतुचालकांना नोंदणी कीट उपलब्ध करुन त्यांच्या संगणकचालकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. नागरिकांनी या अतिरिक्त सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन गगराणी यांनी केले आहे.

अप्राप्त ‘आधार’ची दुय्यम प्रत संकेतस्थळावर
ज्यांनी यापुर्वी नोंदणी केली असेल त्यांना ओळखपत्र प्राप्त झाले नाही, तर त्यांनी पुन्हा नोंदणी करण्यासाठी केंद्रावर अजिबात जाऊ नये. संबधितांसाठी आधार विभागाने www.uidai.gov.in या संकेतस्थळावर पावतीचा अनुक्रमांक, तारिख, वेळ (सेंकदासह) नमूद केल्यास उपलब्ध मोबाईलवर एसएमएस मिळेल. त्या संदेशातील गुप्त संकेतांक नोंदवल्यानंतर पहिल्या टप्प्यात नोंदणी केलेल्या रहिवाश्यांना त्यांच्या आधार ओळखपत्राची प्रत दिसेल. ती संगणकावर संग्रहीत करुन त्याची प्रिंट घेता येते. सेतु किंवा महा-ई- सेवा केंद्रात सदर तपशील उपलब्ध करुन दिल्यास केवळ 2 रुपयात त्याची दुय्यम प्रत उपलब्ध होऊ शकणार आहे.

====================================================================

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.