nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
नांवाशमनपा हदिदत पाण्याच्या टँकर व्यवस्थेबाबत. ||  
समाचार

Dated :30-Jan-2013
पुर्णा तालुक्यातील 120 पाईप कापले 


दक्षता पथकाकडून पाणीचोरी रोखण्याची कारवाई सुरुच

नांदेड, दि. 30: विष्णुपुरीच्या शंकरसागर जलाशयातील पिण्यासाठी राखीव असलेला संपूर्ण साठा वाचवण्यासाठी दक्षता पथकाकडून पाईप कापण्याची कारवाई सुरु आहे. पथकाने बुधवारी (दि.30) पुर्णा तालुक्यातील चार गावातील 120 तर नांदेड जिल्ह्यातील तीन गावातील 80 असे एकूण 200 पाईप कापून काढले. त्याचबरोबर 60 फूटबॉलसह पेनूरमध्ये विटभट्टीकरिता जलाशयातून पाणी खेचणारे एक जनरेटरही पथकाने जप्त केले आहे.

शंकरसागर जलाशयात सध्या 31.69 दशलक्ष घनमिटर पाणीसाठा उपलब्ध असून सदर पाणी पुर्णत: पिण्यासाठी उपयोगात आणायचे आहे. पाण्याचा शेती किंवा अनावश्यक कारणासाठी अनाधिकृतपणे होणारा उपसा रोखण्यासाठी जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी विशेष दक्षता पथक स्थापन केले आहे. गेल्या दि. 17 जानेवारीपासून अनाधिकृत उपसा रोखण्यासाठी जलाशयाकाठावरील पाईप कापणे, जलाशयात सोडलेले फूटबॉल, विजपुरठ्याचे किटक़ॅट जप्त करणे अशा प्रकारची कारवाई पथकाकडून सुरु आहे. त्यामुळे जलाशयाच्या आरंभापासून 20 किलोमीटरचा परिसर उपसामुक्त झाल्याचा दावा पथक प्रमुख तथा नायब तहसीलदार आर. जी. गळगे, चव्हाण, उपप्रमुख तथा सहाय्यक आयुक्त शिवाजी डहाळे व एस. टी. मोरे यांनी केला आहे. पथकाने आतापर्यंत सुमारे एक हजार जोडण्यांचे पाईप कापले असून 300 हून अधिक फूटबॉल व किटकॅट जप्त केले आहेत.

बुधवारी (दि.30) दक्षता पथकाने जलाशयापासून 40 किलोमिटर अंतरावरील उत्तरेकडील पुर्णा तालुक्यात असलेल्या विष्णुपुरी जलाशयाच्या लाभक्षेत्रात प्रवेश केला. त्यावेळी कंठेश्वर, सातेफळ, कावलगाव, धानोरा (मोत्या) व लोहा तालुक्यातील पेनूर अशा एकूण 5 गावातील सुमारे 120 पाईप कापून शेतीला अवैधरित्या होणारा उपसा रोखण्यात यश मिळवले. त्याचबरोबर दक्षिण बाजूने असलेल्या पथकाने कपिलेश्वर, पेनूर, अंत्येश्वर येथील शेतक-यांकडून जलाशयातून पाणी खेचणारे 80 पाईप कापून 60 फूटबॉल जप्त केले. पेनूर शिवारात जलाशयाच्या काठावर विटभट्टी चालवून त्याकरिता जलाशयातून पाण्याचा उपसा करणारे एक जनरेटरही पथकाने जप्त केले आहे.

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.