nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
नांदेड महानगरपालिका केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजने अंतर्गत राष्ट्रीय नदीकृती आराखडा (NRAP) अंतर्गत गोदावरी नदी कायमस्वरुपी प्रदुषणमुक्त करण्यासाठी उपाययोजना करणे करीता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे व सल्लागाराची नेमणुक करणे. || साफसफाईच्या कामाच्या वेळेत बदल बाबत ||  
समाचार

Dated :28-Jan-2013
‘यशदा’च्या प्रशिक्षणात 26 सदस्यांचा सहभाग 


नांदेड,दि. 28: नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेतील निर्वाचित सदस्यांना महापालिका कामकाजातील क्षमता बांधणीसाठी यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीने (यशदा) आयोजीत केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात महापालिकेतील प्रत्येकी 13 नगरसेवक व नगरसेविका अशा 26 सदस्यांनी सहभाग घेतला आहे. दि. 28 ते 30 जानेवारी 2013 या काळात सदर प्रशिक्षण घेतले जाणार असून यात महापालिका अधिनियम, सभेचे कामकाज, प्रशासकीय अधिकार तसेच अन्य विषयासंबधी चर्चा केली जाणार आहे.

उपमहापौर आनंद चव्हाण, विरोधी पक्षनेते दीपकसिंह रावत, नगरसेवक श्रीनिवास सातोलीकर, बाळासाहेब देशमुख, बालाजी कल्याणकर, किशोर भवरे, विनयकुमार गुर्रम, अशोक उमरेकर, शफी अहेमद कुरेशी, संजय मोरे, अभिषेक सौदे, सुंदरलाल गुरखुदे, सतीश राखेवार, नगरसेविका गंगासागर आनेवार, मोहिनी कनकदंडे, वाजेदा तब्बसुम, सोनाबाई मोकले, श्रध्दा चव्हाण, रजिया बेगम, अंजली गायकवाड, प्रा. डॉ. ललिता बोकारे, डॉ. करुणा जमदाडे, सविता कंठेवाड, सय्यद इतरत फातेमा, सिंधू काक़डे, पुष्पाबाई शर्मा असे 26 सदस्य प्रशिक्षणासाठी सोमवारी (दि.28) सकाळपर्यंत पुण्यात दाखल झाले आहेत.

रविवारी (दि.27) महापालिका प्रशासकीय इमारत येथून रवाना होणार्यास सदस्यांना सहाय्यक आयुक्त संजय जाधव, जनसंपर्क अधिकारी गोविंद करवा, उपअभियंता (यांत्रिकी) राजकुमार वानखेडे यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.

तीन दिवसाचे प्रशिक्षण आटोपून हे सदस्य बुधवारी (दि.30) सायंकाळी नांदेडच्या दिशेने निघणार आहेत. त्यांच्यासोबत सहाय्यक म्हणून आस्थापना व सामान्य प्रशासन विभागातील जमिल अहेमद, यु. टी. कुलकर्णी, एस. व्ही. गोरे, संतोष जोशी, साहेबराव जोंधळे, सुमेध बनसोडे, साईराज मुदीराज, प्रमोद देशमुख, संतोष हिंगणीकर हेदेखील पुण्यात सोबत आहेत.

महापालिका निवडणुका नुकत्याच पार पडल्या. अनेक सदस्य प्रथमच निवडून आले असल्याने त्यांना महापालिकेतील कामकाजासंदभात माहिती देणारे प्रशिक्षण देण्यात यावे, अशी मागणी काही नगरसेवक/नगरसेविकांनी पहिल्याच सर्वसाधारण सभेत केली होती. सदस्यांची ही सूचना मान्य करीत महापालिकेने यशदाशी संपर्क करुन नांदेड महापालिकेतील निर्वाचित सदस्यांसाठी खास प्रशिक्षण कार्यक्रम घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार यशदाने प्रशिक्षण कार्यक्रम निश्चित केला होता. सदर प्रशिक्षणासाठी काही अनुभवी सदस्यांनाही पाठ्वण्यात आले आहे.

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.