nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
नांवाशमनपा हदिदत पाण्याच्या टँकर व्यवस्थेबाबत. ||  
समाचार

Dated :27-Jan-2013
बहनगिरीच्या सादरीकरणामुळे युवतींमध्ये अत्याचार विरोधाचे सामर्थ्य 


नांदेड, दि.27: महापालिकेच्या वतीने मागच्या आठ्वड्यात सुरु झालेल्या ‘बहनगिरी’ शिबिरातील प्रशिक्षणाचे सादरीकरण पालकमंत्री ना. डी. पी. सावंत यांच्यासमोर शनिवारी (दि.26) प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभानंतर करण्यात आले. या सादरीकरणाला उपस्थित मान्यवर आणि प्रेक्षकांनी मोठी दाद दिली. त्याचबरोबर प्रशिक्षणार्थी युवतींमध्ये अत्याचाराविरोधात लढण्याचा आत्मविश्वास पाहून इतरांना महिला व युवतींवर होणार्यार अत्याचाराला विरोध करण्याची प्रेरणा आणि सामर्थ्य मिळाले.

नवी दिल्लीत युवतीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येचा नांदेडसह देशभरात निषेध झाला. देशभरात महिला आणि युवतींवर होणा-या अत्याचाराच्या वाढणार्याष घटनांचा प्रतिकार करण्यासाठी महिला आणि मुलींमध्ये स्वत:चे संरक्षण करण्याचे सामर्थ्य निर्माण झाले पाहिजे, या हेतूने नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने बहनगिरी अभियान नुकतेच सुरु केले आहे. उपक्रमांतर्गत श्री गुरुगोविंदसिघजी स्टेडियमवर महिला व युवतींना स्वसंरक्षणासाठी मोफत मार्शल आर्ट कराटे प्रशिक्षण दिले जात आहे.

शिबिरात तब्बल 500 महिला व युवतीं सहभागी झाल्या आहेत. अर्धापूर, सिडको, पावडेवाडी आणि नांदेडजवळच्या इतर गावांमधूनदेखील सर्व जाती - धर्मातील मुली आणि विवाहित महिला या शिबिरात सहभागी झाले आहेत. शिबिर दि. 14 फेब्रुवारीपर्यंत चालणार असून प्रचंड प्रतिसाद पाह्ता अशी शिबिरे शहरातील विविध भागात घेऊन हा उपक्रम यापुढेही सुरु ठेवण्याचा महापालिकेचा मानस आहे.
महिला किंवा मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न करणार्याह एक आणि अनेक तरुणांना युवतीकडून केला जाणा-या प्रतिकाराच्या प्रात्यक्षिकाचे सादरीकरण पालकमंत्र्यांसमोर दाखवण्यात आले.

केवळ कराटे प्रशिक्षणच नव्हे तर महिला व युवतींचे आत्मबल व मनोबल उंचावण्याचेही काम शिबिरातून सुरु आहे. स्त्री भूण हत्या, बालविवाह प्रतिबंध, घरगुती अत्याचाराचा विरोध, महिला आरक्षण, महिला शिक्षण, विविध स्तरावर होणार्याव अत्याचाराचा संघटीतपणे विरोध करुन महिला व युवतींमध्ये सक्षमपणे वावरण्याचा आत्मविश्वास निर्माण करण्याचे कामदेखील शिबिरातून केले जात असल्याचे महापालिकेच्य वतीने यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमास आ. ओमप्रकाश पोकर्णा, महापौर अब्दुल सत्तार, उपमहापौर आनंद चव्हाण, स्थायी समिती सभापती गणपत धबाले, जिल्हाधिकारी धीरजकुमार, विशेष पोलिस महानिरिक्षक संदीप बिष्णोई, पोलिस अधिक्षक विठ्ठ्लराव जाधव, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, अप्पर आयुक्त रा. ल. गगराणी, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, नगरसेवक शफी अहेमद कुरेशी, शंकर गाडगे, नवल पोकर्णा, सतीश राखेवार आदींची उपस्थिती होती.

====================================================================

====================================================================

====================================================================

====================================================================

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.