nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
नांवाशमनपा हदिदत पाण्याच्या टँकर व्यवस्थेबाबत. ||  
समाचार

Dated :27-Jan-2013
जिल्हा नियोजन समितीवर महापौरांसह चौघे बिनविरोध  


नांदेड, दि. 27: जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी मोठ्या नागरी क्षेत्रातून (महापालिका) महापौर अब्दुल सत्तार, नगरसेविका वाजेदा तब्बसुम अथर अली, प्रा. डॉ. ललिता बोकारे-शिंदे, पार्वती जिंदम असे महापालिकेतील चार निर्वाचित सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. महापालिका क्षेत्रातून केवळ अनुसूचित जाती प्रवर्गाच्या एका जागेसाठी मतदान घेतले जाणार असून दोन उमेदवार रिंगणात आहेत.

मोठ्या नागरी क्षेत्रातून (महापालिका सदस्यांमधून) एकूण पाच सदस्य जिल्हा नियोजन समितीवर पाठ्वण्यात येणार आहेत. त्यात सर्वसाधारण महिलांसाठी दोन व सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती, इतर मागास प्रवर्गातील महिला याप्रमाणे प्रत्येकी एक सदस्य पाठ्वायचा आहे. सर्वसाधारण प्रवर्गाच्या एका जागेसाठी कॉंग्रेसच्याच दोन सदस्यांचे अर्ज होते. त्यात सभागृह नेते विरेंद्रसिंघ गाडीवाले यांनी आपले नामनिर्देशपत्र मागे घेतल्याने महापौर अब्दुल सत्तार यांची बिनविरोध निवड झाली. सर्वसाधारण महिला प्रवर्गातील दोन जागेसाठी कॉग्रेसचे दोन व राष्ट्रवादी कॉग्रेसच्या एक अशा तीन जणांचे अर्ज होते. परंतु राष्ट्र्वादीच्या इतरत फातेमा मजहर हुसेन यांनी आपला अर्ज मागे घेतल्यामुळे प्रा. डॉ. ललिता बोकारे-शिंदे आणि वाजेदा तब्बसुम अथर अली या दोघांची बिनविरोध निवड झाली. नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला राखीव जागेसाठी कॉंग्रेसच्याच दोन सदस्यांनी अर्ज भरले होते. परंतु मंगला गजानन देशमुख यांनी माघार घेतल्याने पार्वती जिंदम यांची बिनविरोध निवड झाली. अनुसूचित जाती प्रवर्गातून तिघांनी अर्ज भरले होते. किशोर भवरे यांनी माघार घेतल्याने उमेश पवळे आणि अभिषेक सौदे यांच्यात निवडणूक घेतली जाणार आहे. या निवडणुकीसाठी महापालिकेच्या सर्व अर्थात 81 निर्वाचित सदस्यांना मतदान करण्याचा अधिकार आहे.

नियोजन समितीवर बिनविरोध निवड झालेल्या सर्व सदस्यांचे प्रजासत्ताक दिनाच्या चहापान कार्यक्रमात सर्वांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. जिल्हा नियोजन समितीकडून महापालिकेकरिता विविध योजना आणि उपक्रमासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करुन देण्यासाठी नवनिर्वाचित सदस्य निश्चितच सहकार्य क्रतील, अशी अपेक्षा आयुक्त जी. श्रीकांत यांनी व्यक्त केली. याप्रसंगी महापौर अब्दुल सत्तार, उपमहापौर आनंद चव्हाण, विरोधी पक्षनेते दिपकसिंह रावत, स्थायी समिती सभापती गणपत धबाले, सभागृह नेते विरेंद्रसिंह गाडीवाले व अन्य नगरसेवक उपस्थित होते.

====================================================================

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.