nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
नांवाशमनपा हदिदत पाण्याच्या टँकर व्यवस्थेबाबत. ||  
समाचार

Dated :23-Jan-2013
वाहने उचलणा-या ठेकेदाराचा परवाना रद्द 


महापौरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांच्या तक्रारीवरुन आयुक्तांची कारवाई

वादग्रस्त परवानाधारक आता देगलूर नाका व इतवा-यातीलच वाहने उचलणार

नांदेड, दि. 23: शहरात नियमबाह्य पार्किंग केलेली वाहने उचलून दंड आकारण्यासाठी नियुक्त केलेल्या ठेकेदाराचा परवाना रद्द करण्याचे आदेश महापलिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी बुधवारी (दि.23) सायंकाळी बजावले आहेत. महापौर अब्दुल सत्तार यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवकांनी ठेकेदाराच्या कार्यपध्दतीविरोधात नुकत्याच तक्रारी केल्या होत्या. अप्पर आयुक्त रा. ल. गगराणी यांनी या प्रकरणात चौकशी करुन त्याचा परवाना निलंबीत करण्याची शिफारस केली होती. वादग्रस्त परवानाधारकास आता केवळ देगलूर नाका आणि इतवारा या दोन भागातच वाहने उचलून दंड आकारण्याची मुभा राहणार असून शहरातील अन्य ठिकाणी वाहने उचलली तर नागरिकांनी त्यास दंडाची रक्कम देऊ नये आणि कायदेशीर कारवाई करावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

पार्किंगच्या जागेवर न लावलेली वाहने उचलून त्यांना रोख दंड आकारण्याची परवानगी संबधीत ठेकेदारास सहा महिण्यापूर्वी देण्यात आली होती. नागरिकांशी सौजन्याने वागून त्यांची वाहने पार्किंगला लावण्यासाठी प्रबोधन करणे, पार्किंगच्या ठिकाणी पट्टे तयार करणे, नो पार्किंगचे फलक लावून त्याची देखरेख करणे, झेब्रा क्रासींगचे पट्टे रंगवणे, शहरातील पार्किंग व्यवस्थेची देखभाल करणे, कर्मचार्यां्ना गणवेशात उपस्थित ठेवणे, उचललेली वाहने ठेवण्यासाठी स्वतंत्र बंदिस्त जागा उपलब्ध करुन वाहनांची काळजी घेणे, कर्मचार्यांलना ओळखपत्र देणे, वाहने उचलताना महापलिकेचा कर्मचारी सोबत ठेवणे अशा विविध अटी घालून दिल्या होत्या. परंतु या अटींचे ठेकेदाराने सर्रास उल्लंघन करुन नागरिकांशी दडपशाहीने वागून त्यांच्याकडून जबरदस्तीने दंड वसूल केल्याच्या तक्रारी होत्या.

अप्पर आयुक्त गगराणी यांनी ठेकेदारास नोटीस बजावून त्याचा खुलासा मागवला होता. ठेकेदाराने त्यास दिलेल्या एकूण क्षेत्रापैकी देगलूर नाका आणि इतवारा या दोन वर्दळीच्या भागातून वाहने उचलण्याच्या कामाकडे अजिबात लक्ष दिले नसल्याचे दिसून आले. त्याचबरोबर तीन चाकी आणि जड वाहनांवर देखील कारवाई केली नसल्याचे दिसून आले. केवळ दुचाकी आणि चारचाकी वाहनांना लक्ष्य करुन दडपशाहीने दंड वसुल केल्याबद्दल अखेर त्याचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पोलिस- महापालिकेची संयुक्त कारवाई सुरु राहणार
ठेकेदाराचा परवाना रद्द करण्याची कारवाई प्रशासकीय स्तरावरुन करण्यात आली असली तरी पार्किंगला शिस्त लावण्यासाठी आता शहर पोलिस वाहतूक आणि महापालिकेच्या वतीने संयुक्त मोहिम हाती घेतली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आपली वाहने दिलेल्या क्षमतेत आणि दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांच्या पार्किंगस्थळावरच व्यवस्थित्रित्या थांबवाव्यात. अन्यथा त्यांची वाहने उचलून पोलिस आणि महापालिकेच्या वतीने स्वतंत्रपणे दंड आकारला जाईल, असे महापालिकेच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.