nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
नांदेड महानगरपालिका केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजने अंतर्गत राष्ट्रीय नदीकृती आराखडा (NRAP) अंतर्गत गोदावरी नदी कायमस्वरुपी प्रदुषणमुक्त करण्यासाठी उपाययोजना करणे करीता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे व सल्लागाराची नेमणुक करणे. || साफसफाईच्या कामाच्या वेळेत बदल बाबत ||  
समाचार

Dated :22-Jan-2013
विष्णुपुरी जलाशयातील 15 किलोमीटरचा परिसर उपसामुक्त 

पथकाच्या दररोज गस्तीमुळे शेतक-यांनी जोडण्या काढल्या

मंगळवारी आणखी 78 जोडण्या तोडल्या

नांदेड, दि. 22: विष्णुपुरी येथील शंकरसागर जलाशयाच्या पात्रात पथकाची दररोज सशस्त्र गस्त सुरु असल्याचे पाहून शेतकरी स्वत:हूनच जलाशयातील मोटारी व जोडण्या काढून घेत आहेत. जिल्हा प्रशासनाने नेमलेल्या दक्षता पथकाने मंगळवारी (दि.22) नांदेड जिल्हा हद्दीतील 33 तर परभणी जिल्हा हद्दीतील 20 फूटबॉल आणि 15 किटकॅट जप्त करुन महावितरण कंपनीच्या ताब्यात दिले असून 40 जोडण्यांचे पाईपही कापले आहेत, अशी माहिती पथकाचे उपप्रमुख व सहाय्यक आयुक्त एस. टी. मोरे आणि शिवाजी डहाळे यांनी दिली.

शंकरसागर जलाशयातील पिण्यासाठी आरक्षित आणि तितकाच उपलब्ध असलेला जलसाठा वाचवण्यासाठी जिल्हा प्रशासनाची कसरत सुरु आहे. या कामासाठी नेमलेल्या दोन दक्षता पथकाकडून दररोज जलाशयातून शेतीसाठी होणारा अनाधिकृत उपसा रोखण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी अनाधिकृत विद्युत जोडण्या घेऊन जलाशयातून पाणी उपसा करण्याचे प्रकार रोखण्यासाठी संबधित गावांचे ट्रान्सफार्मर काढून घेण्याचे आदेश दिले आहेत. ही प्रक्रिया केली तरच जलाशयातून होणारा अनियंत्रित उपसा पूर्णपणे रोखता येणे शक्य असल्याचे मत पथकांनी जिल्हाधिकार्यांाकडे नोंदवले होते. त्यानुसार महावितरण कंपनीकडून ट्रान्सफार्मर काढून घेतले जाणार आहेत.

गेल्या दि. 16 जानेवारीपासून पथकाने जलाशयातील पाणी वाचवण्यासाठी मोहिम हाती घेतली होती. त्याला काही अंशी यश आले असून मंगळवारी जलाशयाच्या दक्षिण बाजूने काळेश्वर ते भनगी आणि उत्तर बाजूने काळेश्वर ते राहाटी हा 15 किलोमीटरच्या परिसरातील अनाधिकृत पाणी उपसा पूर्णपणे थांबवता आल्याचा दावा पथकाने केला आहे. मंगळवारच्या कारवाईत पथकाने परभणी जिल्ह्यातील कावलगाव (ता. पुर्णा) येथील शंकरसागर जलाशयातून पाणी खेचणारे 20 फूटबॉल जप्त केले आहेत.

दक्षता पथक दररोजच सशस्त्र गस्त घालून जोडण्या तोडणे, फूटबॉल जप्त करणे, किटकॅट जप्त करणे अशा विविध पातळीवर कारवाई करीत असल्याने जलाशयातून आता पाणी घेता येणार नाही, याची खात्री शेतकर्यांाच्या मनाला पटली आहे. त्यामुळे जलाशयात सोडलेले जोडण्यांचे पाईप काढून घेऊन स्वत:चे नुकसान टाळले आहे.

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.