nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
नांवाशमनपा हदिदत पाण्याच्या टँकर व्यवस्थेबाबत. ||  
समाचार

Dated :21-Jan-2013
दक्षता पथकाने आणखी सव्वाशे जोडण्या तोडल्या  

विष्णुपुरीतील अवैध पाणी उपसा

नांदेड, दि. 21: विष्णुपुरीच्या शंकरसागर जलाशयातील अनाधिकृत उपशांवर दक्षता पथकाकडून धडक कारवाई सुरुच असून सोमवारी (दि.21) जलाशयातून शेतीला पाणीपुरवठा करणारे आणखी 120 जोडण्या निकामी करण्यात आल्या. या मोहिमेत 68 फूटबॉल, 25 स्टार्टर, 50 किटकॅट जप्त करण्यात आले असून 60 पाईप कापण्यात आले आहेत.

पिण्यासाठी आरक्षित असलेले पाणी वाचवण्यासाठी सोमवारी दक्षता पथक काळेश्वर मंदीरापासून 35 किलोमीटर अंतर असलेल्या पेनूरच्या पुलापर्यंत पोहचले. ज्या शेतकर्यांवना आतापर्यंत सूचना देण्यात आलेल्या नव्हत्या, त्यांना आज पथकाने 24 तासाची मुदत देऊन जोडण्या मोटारीसह काढून घेण्याचे आवाहन केले. उद्या मंगळवारी दुपारपर्यंत जोडण्या काढल्या नाहीत तर संबधित भागातही पाईप कापण्यासह जोडण्या तोडण्याची मोहिम हाती घेण्यात येणार आहे.

जलाशयाच्या दक्षिणेकडील भनगी, कपिलेश्वर, आणि उत्तरेकडील जैतापूर आणि राहाटी या चारही गावातील गोदावरी नदीकाठावर असलेले ट्रान्सफार्मर काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महावितरण कंपनीच्या अधिकार्यां ना कळविले आहे. सदर ट्रान्सफार्मरवरुन त्या क्षेत्रातील शेतकर्यां कडून नियमबाह्य जोडण्या लावून जलाशयातून पाणी खेचले जाण्याचे प्रमाण अधिक असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पथकप्रमुख व नायब तहसीलदार आर. जी. गळगे, सहाय्यक आयुक्त एस. टी. मोरे, शिवाजी डहाळे यांनी दिली.
Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.