nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
नांदेड महानगरपालिका केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजने अंतर्गत राष्ट्रीय नदीकृती आराखडा (NRAP) अंतर्गत गोदावरी नदी कायमस्वरुपी प्रदुषणमुक्त करण्यासाठी उपाययोजना करणे करीता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे व सल्लागाराची नेमणुक करणे. || साफसफाईच्या कामाच्या वेळेत बदल बाबत ||  
समाचार

Dated :21-Jan-2013
...आम्हीच करु आमचे संरक्षण! 

नांदेड, दि. 21: तू त्यांच्या वाटेला जाऊ नको, असे सांगून बालवयातच मुलींना अन्याय सहन करण्याचे धडे दिले जाणे चुकीचे आहे. पुरुषार्थावर मात करण्यासाठी महिला सक्षमच आहेत. स्वत:चे संरक्षण स्वत: करण्यासाठी देखील आता त्या सिध्द होतील, असा विश्वास स्वसंरक्षण शिबिरात सहभागी झालेल्या महिला व युवतींनी बोलून दाखवला.

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने श्री गुरुगोविंदसिघजी स्टेडियमवर आयोजित केलेल्या महिला व युवतींच्या मोफत स्वसंरक्षण शिबिरात सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांच्या चेह-यावर आत्मविश्वासाचा उत्साह ओसंडून वाहत आहे. उदघाटनाच्या कार्यक्रमात पूजा शिराढोणकर, सानिया खॉंन, आरती सूर्यवंशी, शिवानी मामडे, निशा बच्चेवार यांच्यासह अन्य महिला व युवतींनी प्रातिनिधीक स्वरुपात दोन दिवसातील अनुभवाचे कथन केले.

दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या दुर्दैवी घट्नेनंतर अनेकांनी भाषणे ठोकली, पण कर्तव्य बजावण्यासाठी नांदेड महापालिकेसारखे खूप कमी हात पुढे आले. मिरचीची पूड वाटप केल्याने अत्याचार थांबणार नाहीत तर अत्याचाराला विरोध करण्याची जिद्द निर्माण होणे आवश्यक आहे. डोळ्यात मिरची पूड टाकून पळण्य़ापेक्षा त्या प्रवृत्तीचा तेथेच प्रतिबंध केला तर उद्याचे दुर्दैवी प्रकार टाळता येतील, असे मत शिबिरात सहभागी झालेल्या महिलांनी व्यक्त केले.

‘भाईगिरी’चे उत्तर ‘बहनगिरी’ने !
बसमधील सीटवर ‘भाऊ थोडी जागा देता का हो’, म्हणणार्याल युवतींनी आता महिलांसाठी आरक्षित असलेल्या सीटवरुन त्याला उठवण्याची हिम्मत बांधली आहे. टपो-याने शिट्टी वाजवली तर त्याच्या कानाखाली वाजवण्यासाठी मुलींचे काही हात उद्या पुढे आले, तर नवल वाटायला नको. झॉशीच्या राणीला डोळ्यासमोर ठेवून भाईगिरीचे उत्तर बहनगिरीने देण्याचा संकल्प युवतींनी सोडला आहे. दिल्ली आणि देशातील इतर शहराप्रमाणे अत्याचाराच्या घटना घडल्यास संघटीतपणे मुकाबला करण्याचा संकल्प प्रशिक्षणार्थ्यांनी सोडला आहे.
महिला सक्षमीकरणाचे प्रात्यक्षिक
केवळ मार्शल आर्ट कराटेचे प्रशिक्षण नव्हे तर स्त्री भूण हत्या, बालविवाह प्रतिबंध, घरगुती अत्याचाराचा विरोध, महिला आरक्षण, महिला शिक्षण आणि विविध स्तरावर होणार्याग अत्याचाराचा विरोध करुन सक्षमपणे वावरण्याचा आत्मविश्वास निर्माण करण्याचे कामदेखील शिबिरातून केले जात आहे. स्वसंरक्षणाबरोबरच त्यांच्यामधील आत्मबळ वाढवून महिला सक्षमीकरणाची गती वेगवान करण्याच्या दिशेने महापालिकेने पावले टाकली आहेत. आपल्या कर्तव्यापोटी सजग असलेल्या नारींना आत्मनिर्भर केल्यास समाजही योग्य दिशेने वाटचाल करेल, या उद्देशाने महापालिकेने सुरु केलेल्या ‘बहनगिरी’च्या अभियानाचे नागरिकांमधून स्वागत केले जात आहे.

====================================================================

====================================================================

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.