nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
नांवाशमनपा हदिदत पाण्याच्या टँकर व्यवस्थेबाबत. ||  
समाचार

Dated :21-Jan-2013
स्थायी समितीच्या सभापतीपदी गणपत धबाले 

महिला सभापतीपदी डॉ. शीला कदम, उपसभापतीपदी अनुजा तेहरा

नांदेड, दि. 21: स्थायी समितीच्या सभापतीपदी कॉंग्रेसचे गणपत धबाले यांची बहुमताने तर पूर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षण, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या डॉ. शीला सुनील कदम व उपसभापतीपदी कॉग्रेसच्या अनुजा अमितसिंह तेहरा यांची बिनविरोध निवड झाली.

या दोन्ही समित्यांची विशेष सभा सोमवारी (दि.21) पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी धीरज कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सकाळी दहा वाजता स्थायी सभेचे कामकाज सुरु झाले. स्थायीच्या सभापतीपदाची निवड पूर्ण झाल्यानंतर पूर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षण, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती आणि त्यानंतर उपसभापतीपदासाठी निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली.

स्थायी सभापतीपदासाठी धबाले आणि शिवसेनेचे डिंपलसिंघ नवाब यांचे उमेदवारी अर्ज आले होते. सभेत झालेल्या छाननीत दोघांचेही अर्ज वैध ठरल्यानंतर अर्ज मागे घेण्यासाठी 15 मिनीटांचा अवधी देण्यात आला. या कालावधीत दोघांनीही आपली उमेदवारी कायम ठेवल्यामुळे निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. उपस्थित सदस्यांचे हात उंचावून मतदान नोंदवण्यात आले. त्यात धबाले यांना क़ॉंग्रेसचे 8 व राष्ट्रवादी कॉंग्रेस सदस्यांचे दोन असे 10 तर नवाब यांना शिवसेनेची 3 मते मिळाली. एमआयएमचे तीन सदस्य तटस्थ होते. या प्रक्रियेत गणपत धबाले यांना अधिक मते मिळाल्याने ते निवडून आल्याचे पिठासीन अधिकार्यांानी जाहीर केले.

महिला समितीच्या सभापतीपद आणि उपसभापतीपदासाठी दोन जणांचे प्रत्येकी दोन नामनिर्देशनपत्र प्राप्त झाले होते. आधी सभापती व त्यानंतर उपसभापतीपदाची निवड प्रक्रिया घेण्यात आली. कॉंग्रेसच्या सदस्या अनुजा अमितसिंह तेहरा यांनी सभापतीपदासाठीचा तर अन्नपुर्णा जम्मुसिंह ठाकूर यांनी उपसभापतीपदासाठी भरलेले अर्ज मागे घेतला. सभापतीपदी डॉ. शीला सुनील कदम व उपसभापतीपदी अनुजा अमितसिंह तेहरा यांची बिनविरोध निवड झाल्याचे पीठासीन अधिकार्यांपनी जाहीर केले.

छाननी, अर्ज मागे घेण्याची संधी, निवड प्रक्रियेसाठी उमेदवारांची अंतीम यादी, मतदान व घोषणा अशी प्रक्रिया पार पडली. अप्पर आयुक्त रा. ल. गगराणी, उपायुक्त रत्नाकर वाघमारे, नगरसचिव पी. पी. बंकलवाड यांनी निवडणूक प्रक्रियेसाठी सहकार्य केले.

स्थायी समिती सभेला कॉंग्रेसचे स. सरजीतसिंघ गील, सतिश राखेवार, फारुखअली खॉंन, अब्दुल लतिफ, सौ. मोहिनी कनकदंडे, कमलबाई मुदीराज, तहेसीन बेगम, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गफार खॉन आणि सौ. श्रध्दा चव्हाण, शिवसेनेचे स. गुरमितसिंघ नबाब, अशोक उमरेकर, सौ. शांता मुंडे, एमआयएमचे चांदपाशा कुरेशी, लतिफा बेगम, संविधान पार्टीच्या अंजली गायकवाड तर महिला समिती सभेला कॉंग्रेसच्या सौ. अन्नपूर्णा जम्मुसिंह ठाकूर, सोनाबाई रामचंद्र मोकले, स्नेहा सुधाकर पांढरे, गंगाबाई नारायणराव कदम, वैजयंती भीमराव गायकवाड ह्या सदस्या उपस्थित होत्या. या सभेला शिवसेना आणि एमआयएमच्या प्रत्येकी 2 अशा 4 सद्स्या गैरहजर होत्या. निवडीनंतर पीठासीन अधिकारी व जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकार्यां चा सत्कार करुन त्यांच्या कामासाठी शुभेच्छा दिल्या.

आमदार, महापौर – उपमहापौरांनी केला सत्कार
दोन्ही समित्यांच्या पदाधिकार्यां ची निवड झाल्यानंतर आमदार अमरनाथ राजूरकर, महापौर अब्दुल सत्तार, उपमहापौर आनंद चव्हाण, सभागृह नेते विरेंद्रसिंघ गाडीवाले, श्याम दरक व दोन्ही समित्यांच्या सदस्यांसह नगरसेवकांनी नूतन पदाधिकार्यां ना त्यांच्या दालनात नेऊन खुर्चीवर विराजमान केले. याप्रसंगी नगरसेवक नवल पोकर्णा, किशोर भवरे, किशोर यादव, डॉ. करुणा जमदाडे, प्रा. डॉ. ललिता बोकारे, उमेश पवळे, शंकर गाडगे, विनय गिरडे पाटील, वाजेदा तब्बसूम अथर अली, गंगासागर आनेवार, रजियाबेगम अय्युबखान आदी उपस्थित होते.

====================================================================

====================================================================

====================================================================

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.