![]() | ||
| ||
समाचार |
|
Dated :20-Jan-2013 |
|
नांदेड महापालिकेने रुजवली ‘बहनगिरी’ | |
नांदेड, दि. 20: गांधीगिरी, भाईगिरी, दादागिरी, अण्णागिरी असे वेगवेगळे शब्दप्रयोग आजवर अनेकांच्या कानावर पडले आहेत. परंतु युवतींमध्ये स्वसंरक्षणाचे बळ जागवून महापालिकेने ‘बहनगिरी’ हा नवा शब्दप्रयोग रुजवला आहे. गेल्या दोन दिवसांपासून श्री गुरुगोविंदसिघजी स्टेडियमवर सुरु असलेल्या मार्शल आर्ट कराटेचे प्रशिक्षण घेताना युवती व महिलांना आत्मसन्मान व स्वाभिमानाचा जागर घालण्यास प्रोत्साहित करण्याचे कामही केले जात आहे. निमित्त होते महिला व युवतींना स्वसंरक्षणासाठी महापालिकेने आयोजित केलेल्या शिबिराचे. दि. 18 पासून सकाळी व सायंकाळी अशा दोन सत्रात होणार्या या शिबिरात सहभागी होणार्या महिला व युवतींना मोफत प्रवेश देण्यात आला. सुमारे 300 महिला-युवतींनी शिबिरात आपला सहभाग नोंदवला. रविवारी (दि.20) उपमहाप्पौर आनंद चव्हाण यांच्या हस्ते आणि विरोधी पक्षनेते दिपकसिंह रावत यांच्या अध्य्क्षतेखाली शिबिराचे उद्घाटन झाले. मनपा आयुक्त जी. श्रीकांत, सभागृह नेते विरेंद्रसिंघ गाडीवाले, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. साहेबराव मोरे, सहाय्यक आयुक्त शिवाजी डहाळे, स्टेडियम व्यवस्थापक रमेश चवरे, जनसंपर्क अधिकारी गोविंद करवा, कराटे प्रशिक्षक विक्रांत खेडकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना उपमहापौर चव्हाण यांनी महिला व मुलींनी त्यांच्याकडे असलेली सहनशिलता अन्याय सहन करण्याकरिता वापरु नये. महापालिकेच्या वतीने गुणवंतांसाठी स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करुन तेथे जिल्ह्यातील अधिकार्य़ांना प्रशिक्षण देण्यासाठी पाचारण करावे, असा आग्रह त्यांनी केला. विरोधी पक्षनेते दिपकसिंह रावत यांनी आपली मागणी मान्य केल्याबद्दल आयुक्तांचे आभार मानत सदर प्रशिक्षण 3 महिने सुरु ठेवण्याची विनंती केली. सभागृह नेते गाडीवाले यांनी केलेला विचार कृतीत उतरवून आयुक्तांनी चांगला पायंडा पाडल्याबद्दल समाधान व्यक्त केले. आयुक्त जी. श्रीकांत यांनी आपल्या प्रास्ताविकात या उपक्रमामागची भूमिका विशद केली. देशातील वाढत्या घटना पाहून नांदेड शहरातील महिला व मुलींमध्ये स्वसंक्षणाचे बळ निर्माण करण्याची आपली इच्छा होती. सर्व पक्षाच्या नगरसेवकांनी पाठबळ दिल्यामुळे हे विचार कृतीत उतरवता आल्याचेही त्यांनी मान्य केले. याप्रसंगी शिबिरात सहभागी झालेल्या काही युवतींनीही मनोगत व्यक्त केले. सहाय्यक आयुक्त डहाळे यांनी सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन केले.
====================================================================
==================================================================== |
|