nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
नांवाशमनपा हदिदत पाण्याच्या टँकर व्यवस्थेबाबत. ||  
समाचार

Dated :20-Jan-2013
सोमेश कॉलनीत मंजूर नकाशाविरुध्द बांधकाम करणार्‍याविरुध्द गुन्हा नांदेड, दि. 20: मंजूर नकाशाविरुध्द घराचे बांधकाम करुन परवानगीचा भंग केल्याच्या आरोपावरुन सोमेश कॉलनी भागातील संदीप दुर्गादास गवारे यांच्याविरुध्द शनिवारी (दि.19) वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. महापालिकेच्या क्षेत्रिय कार्यालय क्र. 4, वजिराबादचे इमारत निरिक्षक स. रचपालसिंघ साहू यांच्या तक्रारीवरुन ही कारवाई करण्यात आली.

संदीप दुर्गादास गवारे यांनी सोमेश कॉलनी भागात घर बांधकामासाठी महापालिकेकडून परवानगी घेतली. परंतु परवानगीत मंजूर केलेल्या नकाशाविरुध्द प्रत्यक्ष बांधकाम सुरु केले. या प्रकारास त्या भागातील काही नागरिकांनी आक्षेप घेतला. त्यानंतर दि. 31 ऑगस्ट 2012 रोजी गवारे यांना क्षेत्रिय अधिकारी एस. टी. मोरे यांनी महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम 1966 चे कलम 53 (1) आणि कलम 54 अशा दोन नोटीस बजावून बांधकाम बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या.

सदर बांधकामामुळे शेजारी राहणार्‍या ज्येष्ठ नागरिकांचा हवा आणि सुर्यप्रकाश बंद केला जात असल्याचाही आक्षेप होता.त्यानंतर काही दिवस त्यांनी बांधकाम बंद ठेवले होते. परंतु पुन्हा बांधकाम सुरु केल्याने शेवटी इमारत्निरिक्षक साहू यांनी शनिवारी वजिराबद पोलिसात तक्रार नोंदवली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गवारे यांनी याउपरही बांधकाम सुरु ठेवले तर त्यांच्याविरुध्द अजामिनपात्र गुन्हा नोंदवून त्यांचे उपद्रवकारक बांधकाम पाडण्यात येईल, आणि या प्रक्रियेचा खर्च त्यांच्याकडून वसुल करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.