nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
नांवाशमनपा हदिदत पाण्याच्या टँकर व्यवस्थेबाबत. ||  
समाचार

Dated :20-Jan-2013
पोलिओ लसीकरण मोहिमेचा उपमहापौरांच्या हस्ते शुभारंभ 


• शहरातील मोहिम पाच दिवस चालणार
• 165 पथके देणार सव्वा लाख घरांना भेटी
• मोबाईल आणि कायमस्वरुपी केंद्रेही स्थापन
नांदेड, दि.20: महापालिका क्षेत्रात राबवण्यात येणा-या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ उपमहापौर आनंद चव्हाण यांच्या हस्ते रविवारी (दि.20) सकाळी महापालिकेच्या जंगमवाडी रुग्णालयात झाला. याप्रसंगी आयुक्त जी. श्रीकांत, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. साहेबराव मोरे तसेच आरोग्य विभागातील सर्व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. मनपा क्षेत्रात प्रजासत्ताक दिनाची सुट्टी वगळून (दि.26) पुढील पाच दिवस ही मोहिम सुरु ठेवली जाणार आहे. त्याकरिता नागरिकांनी आपल्या जवळच्या/ सोयीच्या कोणत्याही लसीकरण केंद्रावर जाऊन अथवा मोबाईल संपर्काद्वारे पथकाला थेट घरी बोलावून शून्य ते पाच वयोगटातील बाळाला लस पाजावी, असे आवाहन मनपा आयुक्त जी. श्रीकांत आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. साहेबराव मोरे यांनी केले आहे.

समूळ पोलिओ निर्मूलनासाठी नांदेड महापालिका क्षेत्रातील विविध अंगणवाड्या, महापालिका, शासकीय आणि खाजगी रुग्णालये, शाळा, महाविद्यालय, धार्मिक किंवा सार्वजनिक स्थळे अशा एकूण 265 ठिकाणी पल्स पोलिओ लसीकरण केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. येत्या दि. 14 फेब्रुवारी 2013 रोजी या मोहिमेचा दुसरा टप्पा घेतला जाणार आहे. मोहिमेची महापालिका स्तरावर यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी नर्सींग शाळा, राष्ट्रीय सेवा योजना यांचे विद्यार्थी, आरोग्य कर्मचारी अशा सुमारे 1100 कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.

शहरात उभारण्यात आलेल्या पोलिओ लसीकरण केंद्रावर 795 कर्मचारी तैनात असून या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी 55 सुपरवाझरची नेमणूक करण्यात आली आहे. उद्या दि. 21 जानेवारीपासून पाच दिवस 165 पथके दररोज प्रत्येकी सरासरी 150 याप्रमाणे एकूण 1 लाख 22 हजार 648 घरांना प्रत्यक्ष भेटी देऊन 89 हजार लाभार्थ्यांपर्यत पोहचणार आहेत. लसीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर घरावर विशिष्ट खूण करण्यात येणार असून बंद घर असले तरी घरांवर वेगळी खूण केली जाणार आहे.

शहरात रेल्वे स्टेशन येथे 4, बसस्थानकावर 2, गुरुद्वारा येथे 2, आसना पुल येथे 1 तसेच काही अन्य 4 असे एकून 13 कायमस्वरुपी लसीकरण केंद्र उभारण्यात आले आहेत. मोबाईलवर संपर्क केल्यानंतर संबधित घरी जावून बाळाला लस पाजण्यासाठी काही पथके नियुक्त केले गेले आहेत. मनपा क्षेत्रातील लसीकरण केंद्रांची यादी मनपाच्या संकेतस्थळावर http://nwcmc.gov.in/newsdetail.php?fid=173 या ठिकाणी उपलब्ध आहे.

====================================================================

====================================================================

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.