![]() | ||
| ||
समाचार |
|
Dated :19-Jan-2013 |
|
पाण्यासाठीही आता महापालिकेची शास्तीमाफी आणि अभय योजना | |
नांदेड, दि.19: मालमत्ता कराच्या शास्ती माफी योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर महापालिकेने सर्वसाधारण सभेच्या निर्देशानुसार आता नळधारकांना दिलासा देणारी योजना पुन्हा जाहीर केली आहे. येत्या 31 जानेवारी 2013 पर्यंत थकित व चालू पाणीपट्टी एकाच वेळी भरल्यास 100 टक्के शास्ती माफी मिळणार आहे. त्याचबरोबर ज्यांच्याकडे अनाधिकृत नळ कनेक्शन आहे, अशांविरुध्दची संभाव्य कारवाई टाळण्यासाठी त्यांच्याकडील जोडणी नियमित करुन घेण्यासाठी अभय योजना जाहीर करण्यात आली आहे. येत्या 28 फेब्रुवारी 2013 पर्यंतच अभय योजनेचा लाभ मिळणार असून त्यानंतर धडक कारवाईला सुरुवात करण्यात येणार आहे. नांदेड महापालिका हद्दीत साधारणत: 46 हजार नळ जोडणीधारक आहेत. त्यांना आकारली जाणारी पाणीपट्टीची रक्कम नियमित भरण्यास अनेकजण टाळाटाळ करतात. त्यामुळे नियमाप्रमाणे त्यांना मूळ पाणीपट्टीवर वार्षिक 20 टक्के अतिरिक्त शास्ती आकारली जाते. या प्रक्रियेमुळे अनेक जोडणीधारक नळपट्टी भरण्यास कुचराई करीत असतात आणि त्यांच्याकडील पाणीपट्टी कराची रक्कम व शास्ती दिवसेंदिवस वाढतच जाते. भविष्यात थकबाकीदारांची संख्या कमी होऊन पाणी कर नियमित भरला जावा, याकरिता शास्ती माफीची योजना जाहीर करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या विचाराधिन होता. त्याकरिता थकित व नियमित पाणीपट्टी भरल्यास 100 टक्के अर्थात मूळ पाणीपट्टीच्या रक्कमेवर लागलेल्या 20 टक्के वार्षिक दंडाची रक्कम माफ करण्याची योजना जाहीर केली आहे. अभय योजना 28 फेब्रुवारीपर्यंत यापुर्वी मागील वर्षी राबवलेली अनाधिकृत नळजोडणी धारकांच्या जोडण्या नियमित करण्यासाठी राबवलेली अभय योजना पुन्हा सुरु केली असून त्याची अंतिम मुदत 28 फेब्रुवारी 2013 पर्यंतच आहे. या दोन्ही विषयासंदर्भात गेल्या दि. 24 डिसेंबर 2012 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत चर्चा होऊन ठराव मंजूर झाला होता. त्यानुसार प्रशासनाने ही योजना जाहीर केली आहे. ...अन्यथा टंचाईत पाणी मिळणार नाही सदर योजना अतिशय मर्यादित कालावधीची असल्याने नळधारकांनी याचा लाभ घ्यावा. सध्या विष्णुपुरी शंकर सागर जलाशयात पाण्याचा अतिशय मर्यादित आणि पिण्याइतकाच साठा उपलब्ध आहे. पाणीपट्टी वेळेवर भरली नाही किंवा नळ जोडणी नियमित करुन घेतली नाही तर ऐन टंचाईच्या काळात संबधितांची नळजोडणी तोडण्याची अप्रिय कारवाई करावी लागू शकते, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महापालिका आयुक्त जी. श्रीकांत आनि उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांनी केले आहे.
====================================================================
==================================================================== |
|