nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
डॉ. राम मनोहर लोहीया ग्रंथालय अंतर्गत चालविण्यात येणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ.शंकरराव चव्हाण अभ्यासिका (सिडको) व स्पर्धा परिक्षा केंद्र (जुना मोंढा) प्रवेश करिता लेखी परीक्षेबाबत जाहीर सुचना ||  
समाचार

Dated :19-Jan-2013
सिडकोत सलग दुसर्‍या दिवशीही दोन मालमत्तांना सील  


नांदेड, दि. 19: महापालिकेचा मालमत्ता कर भरण्यास टाळाटाळ केल्यामुळे सिडकोत शनिवारी (दि.19) सलग दुसर्‍या दिवशी आणखी दोन मालमत्तांना सील ठोकण्यात आले. सिडको क्षेत्रिय़ सहाय्यक आयुक्त गुलाम सादेक यांच्या नेतृत्वाखालील वसुली पथकाने ही कारवाई केली. पाच दिवसात संबधितांनी त्यांच्याकडील कराच्या रक्कमेचा भरणा केला नाही, तर त्यांची मालमत्ता जप्त करुन त्यांना दिलेल्या महापालिकेच्या सुविधा बंद करण्यात येतील, असा इशारा देण्यात आला आहे.

सुरजसिंघ ठाकुर यांच्या 10-2-1163 क्रमांकाच्या मालमत्तेपोटी 26 हजार 991 रुपये तर शेख अब्दुल गफार यांच्याकडे 10-2-1155 क्रमांकाच्या मालमत्तेपोटी 27 हजार 33 रुपयांची कर येणेबाकी होती. शनिवारी त्यांच्याकडे करवसुली व जप्ती पथक गेल्यानंतरही त्यांनी कराचा भरणा करण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांच्या मालमत्तेला सील ठोकण्यात आले. इतर मालमत्ताधारकांनीही आपल्याकडील मालमत्ता कर भरुन जप्तीची कारवाई टाळावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.