nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
डॉ. राम मनोहर लोहीया ग्रंथालय अंतर्गत चालविण्यात येणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ.शंकरराव चव्हाण अभ्यासिका (सिडको) व स्पर्धा परिक्षा केंद्र (जुना मोंढा) प्रवेश करिता लेखी परीक्षेबाबत जाहीर सुचना ||  
समाचार

Dated :18-Jan-2013
कोनाळे-माकणे-मुंडे क्लासेसचे सील काढले 

धनादेश व इमारत नियमितीकरणाची हमी दिल्यानंतर
कोनाळे-माकणे-मुंडे क्लासेसचे सील काढले

नांदेड, दि.18: परवानगीपेक्षा अधिक बांधकाम, विद्यार्थी क्षमतेपेक्षा पार्किंगची कमी व्यवस्था आणि निवासी परवाना घेऊन इमारतीचा अनिवासी वापर केल्याच्या कारणावरुन आयुक्त जी. श्रीकांत यांच्या सूचनेवरुन सहाय्यक आयुक्त अविनाश आटकोरे आणि प्रकाश येवले यांनी काल गुरुवारी (दि.17) राजेंद्रनगर भागातील कोनाळे-माकणे-मुंडे क्लासेसला महापालिकेच्या पथकाने सील लावले होते.

त्यानंतर संबधित मालमत्ताधारक कोनाळे, माकणे व मुंडे यांनी गुरुवारी रात्री (दि.17) आयुक्त जी. श्रीकांत यांची भेट घेऊन झालेली चूक कबूल करीत दंडात्मक रक्कम भरण्याची तयारी दर्शवली. त्याचबरोबर परिक्षा तोंडावर असल्याने शिकवणीविना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, याकरिता सील काढण्याची विनंती आयुक्तांकडे केली. त्यानुसार आयुक्तांनी सदर इमारतीची प्रत्यक्ष पाहणी केली.

सदर इमारतीस मालमत्ताधारकाने निवासी वापराची परवानगी घेऊन इमारतीचा नियमबाह्यरित्या अनिवासी वापर केल्याचे तसेच परवानगीपेक्षा अधिक बांधकाम आणि विद्यार्थी क्षमतेपेक्षा कमी पार्किंग उपलब्ध केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तरीदेखील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी क्लासेस चालकांची विनंती मान्य करुन त्यांनी महापालिकेला दिलेला धनादेश स्विकारताना नवीन विकास नियंत्रण नियमावलीअंतर्गत विहित मुदतीत बांधकाम परवानगीचा सुधारित प्रस्ताव दाखल करण्याची हमी घेतल्यानंतर सील काढण्यास परवानगी दिली.

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.