nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
डॉ. राम मनोहर लोहीया ग्रंथालय अंतर्गत चालविण्यात येणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ.शंकरराव चव्हाण अभ्यासिका (सिडको) व स्पर्धा परिक्षा केंद्र (जुना मोंढा) प्रवेश करिता लेखी परीक्षेबाबत जाहीर सुचना ||  
समाचार

Dated :18-Jan-2013
स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी धबाले आणि नवाब यांचे अर्ज दाखल 


महिला व बालकल्याण समितीच्या दोन जागेसाठी चार अर्ज

नांदेड, दि. 18: नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदासाठी कॉंग्रेसचे गणपत धबाले आणि शिवसेनेचे गुरुमितसिंघ नवाब यांनी आज शुक्रवारी (दि.18) अर्ज भरण्याच्या अखेरच्या क्षणी आपले उमेदवारी अर्ज स्वतंत्रपणे नगरसचिव बंकलवाड यांच्याकडे दाखल केले.

त्याचबरोबर पूर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षण, महिला व बालकल्याण समितीच्या सभपतीपदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या डॉ. शीला सुनिल कदम आणि कॉंग्रेसच्या अनुजा अमितसिंह तेहरा यांनी संयुक्तपणे उमेदवारी अर्ज दाखल केले. तर उपसभापतीपदासाठी अनुजा अमितसिंह तेहरा आणि अन्नापुर्णा जम्मुसिंह ठाकूर या कॉंग्रेसच्या दोन सदस्यांनी संयुक्तपणे उमेदवारी अर्ज दाखल केले.

गणपत धबाले, डॉ. शीला कदम, अनुजा तेहरा आणि अन्नपुर्णा ठाकूर यांच्यासोबत अर्ज भरताना महापौर अब्दुल सत्तार, उपमहापौर आनंद चव्हाण, सभागृह नेते विरेंद्रसिंघ गाडीवाले, नगरसेवक सतीश राखेवार, फारुख अली खॉं, किशोर यादव, शफी अहेमद कुरेशी, किशोर स्वामी, अमितसिंह तेहरा आदींची उपस्थिती होती. तर नवाब यांच्यासोबत उमेदवारी अर्ज दाखल करताना विरोधी पक्षनेते दिपकसिंह रावत, अशोक उमरेकर, विनयकुमार गुर्रम, तुलजेश यादव, शांताबाई मुंडे, दत्ता पाटील कोकाटे, मिलींद देशमुख, बिल्लु यादव आदी उपस्थित होते.

येत्या दि. 21 जानेवारी 2013 रोजी सकाळी 10 वाजता पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी धीरजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या विशेष सभेत आधी स्थायी समिती सभापती व त्यानंतर शिक्षण, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती आणि त्यापाठोपाठ उपसभापतीपदाची निवड होईल.

====================================================================

====================================================================

====================================================================

====================================================================

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.